Siddhi Hande
गुढीपाडव्याला मराठी नववर्ष सुरु होते. नवीन वर्षाची सुरुवात गोडधोड पदार्थाने करायची, असं म्हणतात.
गुढीपाडव्याला तुम्ही घरीच श्रीखंड-पुरीचा बेत करु शकतात.
श्रीखंड बनवण्यासाठी सर्वात आधी चक्का बनवायचा असतो. यासाठी ताजे आणि घट्ट दही सुती कपड्यात घ्या.
हे कापड बांधून ठेवा. हे कापड ५-६ तास कुठेतरी लटकवून ठेवा. जेणेकरुन त्यातील पाणी निघून जाईल.
यानंतर हा चक्का एका भांड्यात काढा. यात पिठीसाखर मिसळून घ्या.
यानंतर साखर आणि चक्का रवीने छान १०-१५ मिनिटे फेटून घ्या. याची स्मूथ क्रिम होईल.
यामध्ये तुम्हाला वेलजी-जायफळ पूड, दूधात भिजवलेले केशर घालायचे आहे. यावर ड्राय फ्रुट्स, चारोळी टाकून घ्या.
हे श्रीखंड १-२ तास फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरुन ही साखर पूर्णपणे विरघळेल.
Next: सणासुदीला घरच्या घरी बनवा बंगाली स्टाईल स्वादिष्ट संदेश, वाचा सोपी रेसिपी