Shruti Vilas Kadam
संदेश बनवण्यासाठी सर्वप्रथम १ लिटर दूध उकळा. दूध उकळल्यानंतर त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालून दूध फाडा. तयार झालेला छेना स्वच्छ कापडात गाळून पाणी पूर्ण काढून टाका.
छेना थोडा थंड झाल्यावर तो हाताने चांगला मळून घ्या. छेना जितका मऊ होईल तितका संदेश चविष्ट आणि स्मूद तयार होतो.
मळलेल्या छेनामध्ये साखर आणि थोडी वेलची पावडर घालून पुन्हा चांगले मिसळा. यामुळे संदेशाला छान सुगंध आणि गोडवा मिळतो.
हे मिश्रण मंद आचेवर पॅनमध्ये ४ ते ५ मिनिटे हलके परता. मात्र जास्त शिजवू नका, नाहीतर मिश्रण कडक होऊ शकते.
मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे छोटे गोळे करून साच्याच्या मदतीने किंवा हाताने वेगवेगळे सुंदर आकार द्या.
संदेशवर पिस्ता, बदाम किंवा केशर घालून सजवा. त्यामुळे त्याचा लूक आणि चव दोन्ही अधिक छान लागतात.
तयार संदेश ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर हे स्वादिष्ट बंगाली स्वीट सर्व्ह करा.