Shruti Vilas Kadam
त्रिशा एका चित्रपटासाठी साधारण ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन घेते. काही मोठ्या प्रोजेक्टसाठी ५ कोटी रुपयांपर्यंत ती मानधन घेते.
चित्रपटांव्यतिरिक्त ती अनेक ब्रँड्सच्या जाहिराती आणि प्रमोशनमधूनही मोठी कमाई करते. काही रिपोर्टनुसार, जाहिराती आणि प्रमोशनल डील्समधून तिला कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न मिळतं.
त्रिशा कृष्णनचं चेन्नईमध्ये सुमारे १० कोटी रुपयांचं आलिशान घर आहे. या घराच्या इंटिरिअर डिझाइन आणि आधुनिक सजावटीमुळे ते विशेष चर्चेत असतं.
चेन्नईव्यतिरिक्त त्रिशाकडे हैदराबादमध्ये सुमारे ६ कोटी रुपयांचा बंगला देखील आहे. चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान ती येथे राहते.
तिच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या कार्स आहेत. त्यात Mercedes-Benz S-Class, BMW 5 Series आणि Range Rover Evoque यांसारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.
त्रिशा कृष्णनने दोन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. सामी, वर्षाम, विनयतांडी वरुवाया आणि लिओ यांसारख्या चित्रपटांमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली.
दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णनची एकूण संपत्ती सुमारे ८५ ते ९० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे ती साउथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.