Shruti Vilas Kadam
नियमित चालल्याने मेंदूतील तणाव कमी करणारे हार्मोन्स सक्रिय होतात. त्यामुळे मन शांत राहते आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.
चालण्यामुळे शरीरात एंडॉर्फिन नावाचे ‘हॅपी हार्मोन्स’ तयार होतात. त्यामुळे मूड चांगला राहतो आणि नकारात्मक विचार कमी होतात.
दररोज काही वेळ चालल्याने चिंता, घाबरटपणा आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
कामाच्या ताणातून थोडा वेळ चालायला गेल्यास मेंदूला विश्रांती मिळते आणि विचार अधिक स्पष्ट होतात.
नियमित चालल्याने शरीर रिलॅक्स होते. त्यामुळे रात्रीची झोप चांगली लागते आणि तणाव कमी होतो.
चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.
उद्यानात किंवा निसर्गाच्या सान्निध्यात चालल्यास मन अधिक प्रसन्न होते आणि तणाव दूर होण्यास मदत होते.