Dadpe pohe Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी तयार करा महाराष्ट्रीयन स्पेशल दडपे पोहे, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

दडपे पोहे बनवण्यासाठी जाड पोहे, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, किसलेला नारळ, कोथिंबीर, साखर, मीठ, लिंबाचा रस आणि थोडेसे शेंगदाणे लागतात.

Dadpe Pohe | yandex

पोहे स्वच्छ करून घ्या

पोहे हलकेच पाण्याने धुऊन घ्या आणि पाणी निथळू द्या. त्यामुळे पोहे मऊ होतात आणि खायला छान लागतात.

Dadpe Pohe Recipe | yandex

मसाला तयार करा

एका मोठ्या भांड्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, किसलेला नारळ, कोथिंबीर, मीठ आणि साखर घालून चांगले मिसळा.

Dadpe Pohe | yandex

पोहे मिश्रणात घाला

तयार केलेल्या मसाल्यात मऊ झालेले पोहे घालून हलक्या हाताने एकत्र करा.

Dadpe pohe Recipe | Saam Tv

लिंबाचा रस आणि शेंगदाणे घाला

चव वाढवण्यासाठी त्यात लिंबाचा रस आणि भाजलेले शेंगदाणे घाला. त्यामुळे पोह्यांना खास चव येते.

Dadpe pohe Recipe | Saam Tv

दडपून ठेवा

मिश्रण झाकण ठेवून काही मिनिटे दडपून ठेवा. त्यामुळे सर्व चव पोह्यांमध्ये छान मुरते.

Dadpe pohe Recipe | Saam Tv

सर्व्ह करा

तयार दडपे पोहे वरून कोथिंबीर आणि नारळ घालून सर्व्ह करा. हा झटपट आणि चविष्ट नाश्ता सर्वांना आवडतो.

Dadpe pohe Recipe | Saam Tv

Nath Blouse Designs: लग्नसराईसाठी साधी साडी किंवा पैठणीवर उठून दिसतील 'हे' ट्रेंडी खास नथ डिझायनर ब्लाऊज

Nath Blouse Designs | Saam Tv
येथे क्लिक करा