OTT Released This Week : 'कोटा फॅक्टरी सीझन ३', 'अरनमनाई ४'सह अनेक मोस्ट अवेटेड सीरिज आणि चित्रपट पाहायला मिळणार, जाणून घ्या यादी...

OTT Released This Week : प्रत्येक आठवड्यामध्ये ओटीटीवर सिनेरसिकांसाठी वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होत असतात.
OTT Released This Week : 'कोटा फॅक्टरी सीझन ३', 'अरनमनाई ४'सह अनेक मोस्ट अवेटेड सीरिज आणि चित्रपट पाहायला मिळणार, जाणून घ्या यादी...
List of OTT Released This WeekSaam Tv
Published on

प्रत्येक आठवड्यामध्ये ओटीटीवर सिनेरसिकांसाठी वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होत असतात. प्रत्येक आठवड्यामध्ये मराठी, हिंदीसह वेगवेगळ्या भाषेतील कलाकृती रिलीज होत असतात. अशातच या ही आठवड्यातही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास पर्वणी असणार आहे.

Amazon Prime Video, Netflix, Zee 5, Disney Plus Hotstar, Jio Cinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांना अनेक दमदार चित्रपट आणि वेबसीरिज पाहायला मिळणार आहेत. जाणून घेऊया या आठवड्यात कोणकोणत्या कलाकृती रिलीज होणार आहेत...

Kota Factory Season 3
Kota Factory Season 3Saam Tv

कोटा फॅक्टरी सीझन- ३ (Kota Factory Season 3)

राजस्थानमधील कोटा शहरामध्ये देशभरातील विद्यार्थी नीट आणि जेईई परिक्षेची तयारी करणासाठी येत असतात. या शहरामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर आधारीत असलेल्या ह्या सीरीजचा आता तिसरा सीझन रिलीज होणार आहे. हा सीझन २० जून रोजी 'नेटफ्लिक्स' या ओटीटीवर रिलीज झाला आहे.

Aranmanai 4
Aranmanai 4 Movie PosterSaam TV

अरनमनाई- ४ (Aranmanai 4)

तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना स्टारर हॉरर-कॉमेडीपट असलेला 'अरनमनाई- ४' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. तमिळ आणि हिंदी भाषेत असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. २१ जूनला 'डिज्ने प्लस हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे.

Maharaj Film
Maharaj Film Controversy Saam Tv

महाराज (Maharaj)

या चित्रपटाच्या माध्यमातून आमिर खानचा मुलगा जुनैद खान सिने इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करतोय. ही सीरीज १९ जून २०२४ रोजी नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे. मल्होत्रा पी. सिद्धार्थने या सीरीजचे दिग्दर्शन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com