Mother's Day Special: सुष्मिता सेन ते करिश्मा कपूर, 'या' बॉलिवूड अभिनेत्री आहेत सिंगल मदर

Bollywood Single Mother Actress: बॉलीवूड अभिनेत्री ज्या सिंगल मदर बनून आपल्या मुलांचे संगोपन करत आहेत.
Bollywood Single Mother Actress
Bollywood Single Mother ActressInstagram

Bollywood Single Mother: आई आणि मुलांचे नाते खूप खास असते. आईची ममता जगा वेगळी असते. मुलांचे संगोपन करण्यात ती कोणतीही कसर ठेवत नाही. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा करतात. या मदर्स डे निमित्त आज आम्ही तुम्हाला अशा बॉलीवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी सिंगल मदर बनून आपल्या मुलांचे संगोपन करत आहेत.

अभिनेत्री सुष्मिता सेनने लग्न केले नसून ती रेनी आणि अलिशा या दोन मुलींचा संभाळ करत आहे. तिने दोन्ही मुलींना दत्तक घेतले आहे. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर सुष्मिताने रेनीला दत्तक घेतले तेव्हा ती केवळ 25 वर्षांची होती. 2010 मध्ये तिने अलिशाला दत्तक घेतले. आता दोन्ही मुली मोठ्या झाल्या आहेत. (Latest Entertainment News)

Bollywood Single Mother Actress
Maharashtrachi Hasya Jatra: माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं की तुझ्या डोळ्यात.. लग्नाच्या वाढदिवशी नम्रता संभेरावने नवऱ्याला दिल्या खास शुभेच्छा

प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता देखील सिंगल मदर आहे. तिचे अफेअर वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत होते. लग्नापूर्वीच नीना गरोदर राहिली राहिली. नंतर विवियनने नीनाशी लग्न केले नाही. अभिनेत्री स्वत: इतकी स्ट्रॉंग होती की तिने मुलगी मसाबाला सिंगल मदर म्हणून वाढवले. आज मसाबा देशातील खूप मोठी डिझायनर आहे.

टीव्ही मालिकेतून घरघरात पोचलेली अभिनेत्री साक्षी तन्वर हिने 2018 साली एक मुलगी दत्तक घेतली आहे, तिचे नाव दित्या आहे. साक्षीच्या या निर्णयावर केवळ तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारच नाही तर चाहत्यांनीही तिला पाठिंबा दिला.

Bollywood Single Mother Actress
Abdu Rozik In Gun Controversy: बिग बॉस फेम अब्दू अडचणीत; पोलिसांत तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

अलीकडेच, इलियाना डिक्रूझने गरोदर असल्याचे सांगितले. इलियाना देखील देखील सिंगल मदर होणार आहे, ज्यामुळे ती गेल्या काही चर्चेत आहे. उर्वशी ढोलकीचा, श्वेता तिवारी या अभिनेत्री देखील सिंगल मदर आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com