Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: जिद्द! एकदा दोनदा नव्हे तर सलग तीन वेळा क्रॅक केली UPSC; IAS चारू यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Charu: यूपीएससी ही सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अनेकादा पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही. IAS चारू यांनी एकदा दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

Siddhi Hande

जर कोणतीही गोष्टी करण्याचा दृढ निश्चय केला तर ते काम पूर्ण करण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या इच्छाशक्तीने अशक्यही गोष्टी आपण सहजपणे शक्य करु शकतो. असंच काहीसं चारु यांनीही केलं आहे. चारू यांनी एकदा दोनदा नव्हे तर सलग तिसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. यूपीएससी ही सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्षा अनेकांना खूप वेळा देऊनही पास करता येत नाही. त्यांनी सलग तीन वेळा ही परीक्षा पास केली आहे.

चारू यांनी शालेय शिक्षण दिल्लीतील रामजस स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शहीद सुखदेव कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीजमधून मॅनेजमेंट स्टडीजमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली . त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अभ्यासासाठी खास स्ट्रॅटेजी वापरली त्यामुळे त्यांना यश मिळाले.

तिसऱ्या प्रयत्नात बनली IAS

IAS चारू यांनी २०१६ मध्ये यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली. त्यावेळी त्यांचे सिलेक्शन भारतीय रेल्वेत IRSS साठी झाले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा २०१८ साली यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांनी २७६ रँक मिळवली. यावेळी त्यांचे सिलेक्शन भारतीय लेखा परीक्षा आणि लेखा सेवा यासाठी झाली. परंतु त्यांना आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांची IAS म्हणून निवड झाली.

चारु यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचे त्यांना फळदेखील मिळाले. त्यांनी आयएएस होण्यासाठी तीनदा यूपीएससी परीक्षा दिली. तिन्ही वेळा त्यांनी ही परीक्षा क्रॅकदेखील केली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मध्य प्रदेशमध्ये इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Artist Death : मनोरंजन विश्वावर शोककळा, सोशल मीडिया स्टारनं घेतला अखेरचा श्वास

मध्य रेल्वेवर प्रवाशांचा खोळंबा; कुर्ल्यापुढे लोकल सेवा बंद|VIDEO

Morning Weight Loss Drink: जिऱ्याचं पाणी की सब्जाचं पाणी? वजन झटपट कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक सर्वात बेस्ट?

Historical Places : प्रेमाचे अद्वितीय प्रतीक! जोडीदारासोबत आयुष्यात एकदा तरी 'हे' ठिकाण फिराच

SCROLL FOR NEXT