Historical Places : प्रेमाचे अद्वितीय प्रतीक! जोडीदारासोबत आयुष्यात एकदा तरी 'हे' ठिकाण फिराच

Shreya Maskar

कपल ट्रिप

उन्हाळ्यात कपल ट्रिप प्लान करत असाल तर ताजमहल हे बेस्ट लोकेशन आहे. येथील सौंदर्य पाहून तुमचा जोडीदार नक्कीच खुश होईल.

A Trip for Couples | yandex

ताजमहल

ताजमहल उत्तर प्रदेशातील आग्रा येथे यमुना नदीच्या काठावर वसलेला आहे. ताजमहाल हे पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडापासून बनवलेले मुघल स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

Taj Mahal | yandex

पर्यटन स्थळे

ताजमहाल जवळ आग्रा किल्ला, मेहताब बाग आणि इतिमद-उद-दौला या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. तुम्ही ताजमहालच्या सौंदर्यात सुंदर फोटोशूट करू शकता.

Tourist Attractions | yandex

कपल ट्रिप

तुम्ही आयुष्यात एकदा तरी आपल्या जोडीदारासोबत ताजमहालला भेट द्या. हे प्रेमाचे प्रतीक आहे. येथे तुम्हाला शांत वातावरण अनुभवता येईल.

Couples | yandex

वास्तुकला

आग्रा येथील ताजमहाल हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. ताजमहाल ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे. जिला पाहण्यासाठी पर्यटक लांबून येतात.

Architecture | yandex

प्रेमाचे प्रतीक

ताजमहाल मुघल सम्राट शाहजहानने आपली पत्नी मुमताज महलच्या आठवणीत बांधला. याचे सौंदर्य जगात भारी आहे. गुंतागुंतीची कलाकुसर पाहून तुमचे डोळे दिपतील.

Symbol of Love | yandex

ताजमहालची सावली

यमुनेच्या काठावर वसलेले ताजमहालचे प्रतिबिंब हे पांढऱ्या संगमरवरी वास्तूच्या सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रकाशात पाण्याच्या शांत पृष्ठभागावर पडणारी ताजमहालाची सावली पर्यटकांना मोहित करते.

The Reflection of the Taj Mahal | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

taj mahal | yandex

NEXT : 'या' किल्ल्याच्या भिंतीवरून दिसतो ताजमहलचा सुंदर नजारा, तुम्ही कधी पाहिलाय का?

Famous Historic Places | saam tv
येथे क्लिक करा...