IPPB Recruitment 2025 : सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा न देता थेट निवड, महिन्याला किती पगार किती मिळणार?

IPPB Recruitment 2025 Update : सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. परीक्षा न देता थेट निवड होणार आहे. या बँकेतील पदासाठी महिन्याला किती पगार किती मिळणार? जाणून घेऊयात.
IPPB Recruitment
IPPB Recruitment 2025Saam tv
Published On

देशातील विविध राज्यात शाखा असलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. या बँकेत ५१ पदांसाठी कंत्राटी भरती काढण्यात आली आहे. या पदांसाठी १ मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. बँकेतील नोकरीसाठी ippbonline.com या वृत्तसंकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे.

पोस्टातील नोकरीसाठी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत २१ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५९ वाजता असणार आहे. या नोकरीसाठी इतर मार्गांनी अर्ज स्वीकारला जाणार नाही. नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, त्याधी अर्ज भरण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे.

IPPB Recruitment
Political News: 'विधानसभेचं रूप राहुल नार्वेकरांमुळे बदललं', शरद पवार गटातील बड्या नेत्यांकडून कौतुक

ईब्लूएस वर्ग - ०३ पदे

ओबीसी - १९ पदे

एसएसी - १२ पदे

एसटी - ४ पदे

बँकेच्या गरजेनुसार, पदांची संख्या वाढवू किंवा कमी करू शकतात.

वयोमर्यादा - अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय हे १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत २१ वर्ष ते ३५ वर्षांदरम्यान असलं पाहिजे.

IPPB Recruitment
Maharashtra Political News: भाजप- राष्ट्रवादीच्या खात्यांवर शिवसेनाचा दावा? शिंदेंना हावीत मलाईदार खाती?

राज्य/केंद्र शासित प्रदेशातील पदांची संख्या

छत्तीसगड - ३ पदे

आसाम - ३ पदे

बिहार - ३ पदे

गुजरात - ६ पदे

हरियाणा - १ पदे

जम्मू आणि काश्मीर - २ पदे

लक्षद्वीप - १ पदे

महाराष्ट्र - ३ पदे

गोवा - १ पदे

अरुणाचल प्रदेश - ३ पदे

मनीपूर - २ पदे

मेघालय - ४ पदे

मिझोरम - ३ पदे

नागालँड - ५ पदे

त्रिपुरा - ३ पदे

पंजाब - १

राजस्थान - १ पदे

तामिळनाडू - २ पदे

पुद्दुचेरी - १ पदे

उत्तर प्रदेश - १ पदे

उत्तराखंड - २ पदे

IPPB Recruitment
Delhi Political News: बेरोजगारांना दरमहा ८,५०० रूपये मिळणार..निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिसरी गॅरंटी जाहीर

उमेदवार फक्त १ पदासाठी अर्ज दाखल करू शकता. बँकेतील नोकरीसाठी कोणत्याही लेखी परीक्षेची गरज नसणार आहे. या पदांसाठी पदवीपर्यंत शिक्षण होणे गरजेचे आहे. पदांची निवड करताना राज्यातील उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. उमेदवारांची निवड ही १ वर्षांच्या कंत्राटावर केली जाणार आहे. कामगिरी चांगली असल्यास उमेदवाराचा कामाचा अवधी २ वर्षांनी वाढवण्यात येईल. उमेदवाराचा कंत्राट हा कमीत कमी ३ वर्षांचा असेल.

अर्ज शुल्क किती?

अर्जासाठी एससी/एससी/पीडब्लूडी वर्गातील उमेदवारांसाठी १५० रुपये अर्ज भरावे लागणार आहेत. तर इतर वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ७५० रुपये असणार आहे.

कशी होणार निवड?

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह पदांसाठी निवड मेरीटच्या आधारावर होणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरताना पदवीचे गुण व्यवस्थित भरावा लागणार आहे. काही उमेदवारांचे गुण सारखे असतील, त्यावेळी उमेदवारांची जन्म तारखेचा विचार केला जाईल. यानंतर मेरीट लिस्टनुसार मुलाखतीसाठी निवड केली जाईल. मुलाखतीनंतर निवड केलेल्या उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर जाहीर केली जाणार आहे.

पगार किती ?

निवड केलेल्या उमेदवारांना मासिक ३०,००० रुपये वेतन दिले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com