Maharashtra Political News: भाजप- राष्ट्रवादीच्या खात्यांवर शिवसेनाचा दावा? शिंदेंना हावीत मलाईदार खाती?

Eknath Shinde And Devendra Fadnavis: विधानसभेच्या निकालात महायुतीला अभूतपुर्व यश मिळालं. त्यानंतर महायुतीत शिंदे गट आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून मोठी रस्सीखेच सुरु होती.
Maharashtra Political News: भाजप- राष्ट्रवादीच्या खात्यांवर शिंदेंचा दावा? शिंदेना हावीत मलाीदीर खाती?
Eknath Shinde And Devendra FadnavisSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही न्यूज

महायुतीला मिळालेल्या यशानंतर अखेर शिंदेंनी मौन सोडलं आणि मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. नेमकं शिंदेंनी काय म्हटलंय? त्याबरोबरच मुख्यमंत्रिपद नसेल तर शिंदेंचा डोळा कोणत्या खात्यांवर असणार आहे? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

विधानसभेच्या निकालात महायुतीला अभूतपुर्व यश मिळालं. त्यानंतर महायुतीत शिंदे गट आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून मोठी रस्सीखेच सुरु होती. मात्र अखेर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडलाय. त्यामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय. दिल्लीच्या दबावामुळेच शिंदेंना दावा सोडावा लागल्याचा पलटवार काँग्रेसने केलाय.

Maharashtra Political News: भाजप- राष्ट्रवादीच्या खात्यांवर शिंदेंचा दावा? शिंदेना हावीत मलाीदीर खाती?
Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच; तिकडे NCP नेत्यांनी दिल्ली गाठली, पडद्यामागं काय घडतंय?

राज्यातील विधानसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवण्यात आल्या. मात्र मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निकालानंतर घेण्यात येणार असल्याचं अमित शाहांनी स्पष्ट केलं होतं. मात्र निकालात भाजपला 132, शिंदे गटाला 57 तर अजित पवारांच्या पक्षाला 41 जागा मिळाल्या. यामध्ये शिंदेंसोबत गेलेले पाच आमदार सोडून इतर सर्व आमदार निवडून आणले. त्यामुळे शिंदेंनी युद्ध जिंकलं होतं.

मात्र आता शिंदेंना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं लागल्याचं चित्र आहे. त्यामुळे शिंदेंकडून मुख्यमंत्रिपदाऐवजी मलईदार खात्यांची मागणी केल्याची माहिती समोर आलीय. शिंदेंचा डोळा अर्थ, गृह, महसूल, नगरविकास, गृहनिर्माण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, कृषी आणिग्रामविकास ही खाती पाहिजेत.

Maharashtra Political News: भाजप- राष्ट्रवादीच्या खात्यांवर शिंदेंचा दावा? शिंदेना हावीत मलाीदीर खाती?
Maharashtra Politics: पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये तिढा, तटकरे, गोगावले पुन्हा आमने-सामने

मोदी-शाहांचा निर्णय मान्य असल्याचं शिंदेंनी जाहीर केलंय. त्यामुळे निवडणुकांच्या ुयुद्धात शिंदे जिंकले असले तरी महायुतीतल्या तहात ते हरल्याची चर्चा आहे. तर आता मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात चांगली खाती पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे कितपत यशस्वी होतात ते दिल्लीतल्या मोदी-शाहांसोबतच्या बैठकीत ठरणार आहे.

Maharashtra Political News: भाजप- राष्ट्रवादीच्या खात्यांवर शिंदेंचा दावा? शिंदेना हावीत मलाीदीर खाती?
Maharashtra Travel : निसर्गप्रेमींसाठी पर्वणी; महाराष्ट्रातील 'हा' खास किल्ला पाहिलात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com