Chandrakant Patil: एकनाथ शिंदे मन मोठं करतील, भाजपला मुख्यमंत्रिपद देतील - चंद्रकांत पाटील

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आता मन मोठं करतील आणि भाजपला मुख्यमंत्रिपद देतील असे चंद्रकात पाटील म्हणाले. लवकरच मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होईल असंही ते म्हणाले.
Chandrakant Patil
Chandrakant Patil
Published On

एकनाथ शिंदे मोठे मन करून आता भाजपला मुख्यमंत्री पद देतील, ते हो म्हणतील पण देवालाही साकड घालायचं असतं म्हणून आज गणपतीला साकडं घातलं आहे. आज बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील, बैठका होतील आणि लवकरच मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ईव्हिएमबाबत कोर्टाने निर्णय दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदावर वर्णी लागावी यासाठी पुण्यातील सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात होमहवन आणि महाआरतीच आयोजन करण्यात आलं आहे. मंत्री चंद्रकात पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आयोजन केल होत.

Chandrakant Patil
Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

तसेच महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरू असताना साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहुर गडावर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी रेणुका मातेची महाआरती करून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत असे साकडं घातल आहे. यावेळी माहूर-किनवट विधानसभा मतदारसंघातील शिंदे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrakant Patil
Maharashtra Air Pollution: सांगलीकर लय भारी, शहराची हवा राज्यात सर्वात शुद्ध; मुंबई-पुण्याला टाकले मागे

दरम्यान, नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री कोण, यावर महायुती मध्ये अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही. महायुतीत तिन्ही पक्ष मुख्यमंत्री यावर दावा करत असताना मेहकरमध्ये लाडक्या बहिणींनी मेहकरचे आराध्या दैवत शरांधगर बालाजी यांना साकडे घातले असून राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच विराजमान व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना राबवल्या असून शिंदे हे लाडके भाऊ आहे. त्यामुळे पुन्हा त्यांचा मुख्यमंत्री पद द्यावे, अशी मागणी केली आहे. तर मेहकर मतदार संघाचे संजय रायमुलकर यांचा पराभव झाल्याने त्यांना विधानपरिषद घ्यावे, यासाठी सुद्धा लाडक्या बहिणी आणि शिवसैनिकांनी साकडे घातले.

Chandrakant Patil
Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com