महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमबाबत अनेक घोळ समोर आल्यामुळे आता मविआनं आक्रमक पवित्रा घेतलाय. ईव्हीएमविरोधात मोठं आंदोलन उभारण्याचा निर्धार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी केलाय. एवढंच नव्हे तर पुरावे जमा करून कोर्टातही जाण्याची तयारी मविआनं केलीय. ईव्हीएमविरोधात नेमकी काय रणनीती मविआनं आखली आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
विधानसभा निवडणुकीत मविआचा दारूण पराभव झाला. मात्र या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्यात आलं. त्याला कारणही तसंच आहे. सुमारे १०० मतदारसंघांमधल्या मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष केलेलं मतदान आणि मतमोजणीत फरक आढळून आल्यामुळे या आरोपांना अधिकच धार मिळाली.
त्यामुळे ठाकरे आणि पवारांनी आपल्या पराभूत उमेदवारांसोबत बैठक घेऊन ईव्हीएमबाबत वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा केली. मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ईव्हीएमविरोधात आंदोलन उभारण्याच्या सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले
ईव्हीएमचा मुद्दा यापूर्वीही राष्ट्रीय पातळीवर उचलण्यात आला होता. मात्र निवडणुकीत विरोधकांचा पराभव झाला की हा मुद्दा उचल खातो आणि निवडणुका जिंकल्या की पुन्हा बासनात गुंडाळला जातो.
मात्र महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये मतांचा घोळ झाल्यामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. त्यामुळे आतातरी विरोधक याविरोधात खरोखर मोठं आंदोलन उभारणार की केवळ बैठका चर्चा आणि बातम्यांपुरताच हा मुद्दा जिवंत ठेवणार याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.