Maharashtra Politics : रोहितच्या विजयाला दादांची 'पॉवर'? राम शिंदेंचे अजितदादांवर गंभीर आरोप

Ajit Pawar Rohit Pawar Election : रोहित पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलेय.
आमदार रोहित पवार
आमदार रोहित पवार
Published On

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीनंतर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर अजित पवार आणि पुतण्या रोहित पवार आमने-सामने आले. त्यावेळी दादांनी केलेल्या वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील स्नेह समोर आलाय. तर दुसरीकडे याच वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडलीय.. मात्र प्रीतिसंगमावर नेमकं काय घडलं? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमधील प्रीतिसंगमावर राजकीय विरोधक असलेले अजित पवार आणि रोहित पवार काका-पुतणे आमने-सामने आले...सगळ्यांना वाटलं दादा आणि रोहित पवार एकमेकांकडे पाहणारही नाहीत....कारण राजकीय आखाड्यात गेल्या दोन महिन्यांपासून दोघेही एकमेकांवर तिखट शब्दांत टीका करत होते. मात्र प्रीतिसंगमावर समोरासमोर आल्यानंतर पवार काका-पुतण्यांमधली प्रीती दिसून आली. एवढंच नव्हे तर काकांनी पुतण्याला हक्कानं आपले पाया पडायला सांगितलं. आणि एकच हशा पिकला...महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवणारं प्रीतिसंगमावरचं नेमकं काय दृश्यं होतं ते पाहूयात....

अजित पवार हे माझे काका आहेत. त्यामुळे मी त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय.. तर शरद पवार आणि माझी वेळ मॅच झाली असती तरी मी सुद्धा त्यांचे आशीर्वाद घेतले असते, असं म्हणत अजित पवारांनी राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक मतभेद नसल्याचे संकेत दिलेत...

'पवारांच्या भेटीचं टायमिंग चुकलं'

मात्र यामुळे महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांना अवघ्या 1243 मतांनी निसटता विजय मिळाला. त्यावरुन मी सभा घेतली असती तर काय झालं असतं? असं विधान अजित पवारांनी केल्यामुळे भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदेंना थेट रडूच कोसळलं....पवार कुटुंबातील अघोषित करारामुळे आपला बळी गेल्याचा आरोप राम शिंदेंनी अजित पवारांवर केलाय.

काका-पुतण्याची भेटीने शिंदेंच्या डोळ्यात पाणी

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार महायुतीत सहभागी झाले. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म न पाळता कुटुंबधर्म पाळल्य़ाची आता चर्चा रंगू लागलीय. मात्र यावरुन आता नवा वाद पेटलाय.. राम शिंदेंनी अजित पवारांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार केलीय.. आता अजितदादांबाबत भाजप पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागलंय. मात्र यामुळे कौटुंबिक संबंध राजकारणा पलिकडे असल्याची महाराष्ट्राची संस्कृती पुन्हा एकदा अधोरेखित झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com