Maharashtra Politics: पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये तिढा, तटकरे, गोगावले पुन्हा आमने-सामने

Mahayuti dispute on seat allocation: महायुतीत खाते वाटपा आधीच पालकमंत्री पदासाठी वाद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक, पालकमंत्री पदावर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीने दावा केला आहे.
Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde
Maharashtra Assembly Election 2024Saam Tv
Published On

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला. लवकरच राज्यामध्ये नवं सरकार स्थापन होणार आहे. पण महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून सध्या वाद सुरू आहेत. पालकमंत्रिपदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मंत्रि‍पद वाटपावरून शपथविधीला उशीर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महायुतीत खाते वाटपा आधीच पालकमंत्री पदासाठी वाद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक, पालकमंत्री पदावर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीने दावा केला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्री पदावर शिवसेना आणि राष्ट्रवादीने दावा केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर भाजप आणि शिवसेनेने दावा केला आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी देखील भाजपसोबत राष्ट्रवादीने दावा केला आहे. रायगड पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आणि अजित पवार गटाने दावा केला आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde
Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

कोणत्या जिल्ह्यासाठी कोणामध्ये रस्सीखेच?

- नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचे गिरीश महाजन तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेनेचे दादा भुसे इच्छुक आहेत. यांच्यामध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे.

- बहूचर्चित रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले आणि आदिती तटकरेंध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde
Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

- तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री पदावर दीपक केसरकर आणि भाजपचे रवींद्र चव्हाण इच्छुक आहेत.

- तर महत्वाचे म्हणजे पुणे

पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अजितदादा आग्रही आहेत. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील हे देखील पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde
Maharashtra Politics : मोठी बातमी! शिंदेंनी भाजपच्या दोन्ही ऑपर धुडकावल्या, नवी मागणी केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com