Maharashtra Ajit Pawar NCP : महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? हा पेच कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अचानक दिल्ली गाठली. मुख्यंत्रिपदावरुन शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच असतानाच अजित पवार यांच्या नेत्यांनी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती? नेमकी चर्चा काय झाली? राष्ट्रवादीने पाठिंब्याचे पत्र दिले का? यांसारख्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (Sunil Tatkare and Praful Patel)
महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आज अचानाक केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील विधानसभा निकालानंतर झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
अमित शाह यांच्यासोबत भेट झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं यश महायुतीला मिळालं. अमित शाह यांचं सातत्याने मार्गदर्शन, सहकार्य आहे. आभार व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भेट झाली, असे तटकरे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. त्यांचेही आभार व्यक्त केले आणि अभिनंदन केले. राज्यातील जनतेने जे यश आम्हाला दिले त्यात मोदींचा मोठा वाटा आहे, असेही तटकरे म्हणाले.
मुख्यमंत्री कोण होणार?
कोणाचे नाव ठरले याबद्दल मला माहिती नाही. ही केवळ सदिच्छा भेट होती. दोन मोठ्या व्यक्तीची भेट होणे ही गौरवाची गोष्ट आहे, असे तटकरेंनी सांगितले. विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांची निवड केली आणि मंत्रिमंडळाबद्दल किंवा सरकारबद्दल सर्वाधिकार अजित पवारांना दिले आहेत. यापेक्षा आमचा वेगळा काही निर्णय झाला नाही, असेही तटकरे म्हणाले.
तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत आहेत, त्यामुळे थोडा वेळ लागतोय. काही औपचारिकता आहेत त्या पार पडत आहेत. एकनाथ शिंदे दीर्घकाळ राज्यात नेते आहेत. त्यांनी अडीच वर्षे सरकारचं नेतृत्व केले आहे, मात्र आकडे भाजपकडे आहेत ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीने सरकार आजवर चालवलं, त्याच पद्धतीने पुन्हा पाच वर्षे सरकार चालेल. दोन दिवसात राज्य सरकारबद्दल निर्णय होईल. कोणती खाती कुणाला याबद्दल आज चर्चा नाही, असेही तटकरेंनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.