Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Maharashtra CM News Highlights: Shinde or Fadnavis? महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत चर्चा सुरु आहेत. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर आहेत.
देवेंद्र फडणवीस
Devendra FadnavisSaam Tv
Published On

Devendra Fadnavis : डाखेबंद यश मिळाल्यानंतर महायुती सरकारचा कॅप्टन कोण असणार याची उत्सुकता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपमध्ये एकमत झाल्याचे बोलले जात आहे. फडणवीसांच्या पारड्यात(Maharashtra New CM News) अनेक जमेच्या बाजू आहेत. पाहूया एक रिपोर्ट...

तडाखेबंद यश मिळाल्यानंतर महायुती सरकारचा कॅप्टन कोण असणार याची उत्सुकता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपमध्ये एकमत झाल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर सध्या कोणतेही संकट दिसत नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणं दिसतंय तेवढं सोप नाही. आजवर त्यांचे ब्राह्मण असणे हे मुख्यमंत्री होण्याच्या विरोधात होते. यासोबतच त्यांच्याबाबत पक्षाच्या महाराष्ट्र युनिटमध्ये बरेच मतभेद होते, पण देवेंद्र फडणवीस यांच्यात काही प्लस पॉइंट्स आहेत जे त्यांना मुख्यमंत्री म्हणून न पाहणाऱ्यांपेक्षा जास्त आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यात असे काय आहे की भाजप त्यांना डावलू शकत नाही. याची नेमकी कारणे काय आहेत. बघूया...

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं मोठं यश मिळवलं आहे. भाजपचे सर्वाधिक 132 आमदार आहेत. पक्षाचा स्ट्राइक रेटही सर्वाधिक आहे. राष्ट्रवादीच्या 41 आमदारांचाही फडणवीसांना पाठिंबा आहे. 5 अपक्ष आमदारही भाजपसोबत आहेत. असे 178 आमदारांचं तगड बहुमत फडणवीसांच्या पाठीशी आहे. नुसतेच आकडे फडणवीसांच्या बाजुने आहेत असं नाही तर आणखी काही मुद्यांमुळे फडणवीसांचं पारडं जड आहे.

भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघही फडणवीसांच्या नावाला अनुकूल आहे. तसंच भाजप कोअर कमिटीही फडणवीसांच्या पाठीशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फडणवीसांवर विश्वास आहे. 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा पंतप्रधानांचा मार्गही महाराष्ट्रातून जातो. बुलेट ट्रेनसह अनेक महत्वकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. पहिल्या तिमाहीत थेट परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. फडणवीस यांनी प्रशासक म्हणून उत्तम ठसा उमटवला आहे. त्यामुळे फडणवीसांरख्या यशस्वी आणि अनुभवी व्यक्तीलाच मुख्यमंत्री करणे गरजेचे आहे. त्यांच्या एवढा अवाका असलेला दुसरा चेहराही भाजपकडे नाही.

या सगळ्या जमेच्या बाजू असल्यानं भाजपच्या हायकमांडला फडणवीसांकडे सीएमपद देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तरीही दिल्लीतील पक्षश्रेष्ठी काही धक्कातंत्र अवलंबणार का? हे पाहण देखील तितकच महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com