सचिन बनसोडे
कोपरगाव (अहिल्यानगर) : कोपरगावमध्ये कोल्हे यांच्या प्रचारात काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग पाहण्यास मिळत नाही. टोकाची भूमिका असलेले अजितदादा आमच्या सोबत आले. आता आम्ही त्यांच्यासोबत बसतोच. कोपरगावमध्ये काळे- कोल्हे निश्चितच एकाच मंचावर दिसतील अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली आहे.
कोपरगाव (Kopargaon News) विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार गटाकडे गेल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र भाजपचे विवेक कोल्हे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने कोल्हे यांची मनधरणी करत त्यांना योग्य तो न्याय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोल्हे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र काळे- कोल्हे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने कोल्हे आणि त्यांचे कार्यकर्ते अद्याप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारात कुठेही सक्रिय झालेले दिसले नाहीत. त्यामुळे महायुतीतील हा पेच सोडवण्यासाठी (BJP) भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन काल रात्री कोपरगावमध्ये आले आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे उमेदवार अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांचे काम करण्याचे आदेश त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलेत.
महायुतीला १७५ जागा निवडून येतील
कोल्हे परिवाराला विरोधी पक्षातील अनेक नेत्यांकडून ऑफर आली. मात्र ते डगमगले नाही आणि पक्ष सोडला नाही. त्यांनी बंडखोरीही केली नाही आणि दुसऱ्या पक्षात गेले नाही. त्यामुळे भविष्यात त्यांचा विचार केला जाईल. विवेक कोल्हे उगवतं नेतृत्व असून अशा नेतृत्वाची भाजपला गरज आहे. सत्ता असो किंवा नसो आमच्या वरिष्ठ नेत्यांनी कोल्हेंना जो शब्द दिला तो पाळला जाईल. टोकाची भूमिका असलेले अजितदादा आमच्या सोबत आले. आता आम्ही त्यांच्यासोबत बसतोच ना!. कोपरगावमध्ये देखील काळे- कोल्हे निश्चितच एकाच मंचावर दिसतील. भाजप महायुतीला बहुमत मिळेल आणि महायुतीच्या किमान १७५ जागा निवडून येतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.