Jalgaon Crime : विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीचा घरात घुसून पत्नीवर प्राणघातक हल्ला

Jalgaon News : पती संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद झाला. म्हणून गेल्या आठ महिन्यांपासून समाधान हा सुनसगाव येथे राहत आहे. तर माधुरी दोन मुलांसह खेडी येथेच राहतात
Jalgaon Crime
Jalgaon CrimeSaam tv
Published On

जळगाव : पती- पत्नीमध्ये वाद झाल्याने आठ महिन्यांपासून दोघे वेगळे राहत होते. यात पती आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. याच संशयातून विभक्त राहत असलेल्या पतीने घराचा दरवाजा तोडून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. तर आईचे प्राण वाचविण्यासाठी गेलेला मुलगाही हल्ल्यात जखमी झाला आहे.

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील खेळी खुर्द येथील माधुरी समाधान सपकाळे (वय ३५) हि विवाहित सदरच्या घटनेत गंभीर जखमी झाली आहे. हि घटना ७ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित पती समाधान सपकाळे (रा. सुनसगाव, ता. भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित समाधान सपकाळे हा रिक्षा चालवितो. तर पत्नी माधुरी हि ब्युटी पार्लरचा व्यवसाय करून संसाराला हातभार लावत होती. दोघे खेडी बुद्रुक येथे राहत होते. मात्र, पती संशय घेत असल्याने (Crime News) त्यांच्यात वाद झाला. म्हणून गेल्या आठ महिन्यांपासून समाधान हा सुनसगाव येथे राहत आहे. तर माधुरी दोन मुलांसह खेडी येथेच राहतात. 

Jalgaon Crime
Amravati News : अमरावतीची जागा कमी झाली तरी चालेल; आमदार रवी राणांचा संजय खोडके यांना खोचक टोला

दोघांमध्ये होत असलेल्या वादामुळे महिलेने घटस्फोटासाठी अर्ज दिलेला असून, त्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, ७ नोव्हेम्बरला मध्यरात्री माधुरी सपकाळे व त्यांची मुले घरात झोपले असताना समाधान याने घराचा दरवाजा तोडून पत्नीवर धारदार शस्त्राने वार केला. ही झटापट सुरू असताना मुलगा विशाल भांडण सोडविण्यासाठी त्यांच्यामध्ये आला असता, त्याच्यावरही शस्त्राने वार केले. शस्त्राने वार केल्याने मायलेक गंभीर जखमी झाले. महिलेने आरडाओरड केल्याने शेजारील महिला घटनास्थळी येताच संशयित समाधान तेथून पसार झाला. त्यानंतर जखमी माय-लेकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com