Delhi Political News: बेरोजगारांना दरमहा ८,५०० रूपये मिळणार..निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिसरी गॅरंटी जाहीर

Congress Announces New Guarantee: काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या गॅरंटीबद्दल आश्वासन दिलंय. युवा उड्डाण असं योजनेचं नाव असून, या योजनेंतर्गत बेरोजगार तरूणांना दरमहा ८,५०० रूपये मिळतील.
Congress NEWS
Congress NEWSSaam Tv News
Published On

काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका नव्या गॅरंटीबद्दल आश्वासन दिलंय. त्यांनी तिसऱ्या गॅरंटीबद्दल जाहीर केलं असून, युवा उड्डाण असं योजनेचं नाव आहे. या योजनेंतर्गत बेरोजगार युवक युवतींना एका वर्षाच्या शिकाऊ उमेदवारासाठी दरमहा ८,५०० रूपये मिळतील. काँग्रेससाठी या गॅरंटीची घोषणा राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि दिग्गज नेते सचिन पायलट यांनी जाहीर केलं आहे.

योजनेची घोषणा करताना पायलट म्हणाले, आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. या निमित्ताने युवक आणि युवतींसाठी एका गॅरंटीची घोषणा करणार आहोत. भाजप आणि आप हे दोन्ही पक्ष युवकांबद्दल विचारपूस करीत नाहीत. आजच्या घडीला संपूर्ण देशातील तरूणवर्ग बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. राजकारणात गेल्या काही वर्षात केवळ आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यामध्ये दिल्ली आणि केंद्र सरकारचा समावेश आहे.

Congress NEWS
Youth deaths: झोपेनं घात केला! कुकरमध्ये चणे टाकले अन् डोळा लागला, गुदमरून दोघांचा मृत्यू

त्यामुळे काँग्रेसचा विधानसभा विधानसभा निवडणुकीत विजय झाला तर, तरूणांवर आम्ही लक्ष केंद्रित करू. आम्ही सत्तेत आलो तर, दिल्लीतील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना दरमहा ८,५०० रूपये देऊ. तसेच युवकांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित कामे देखील दिले जातील, जेणेकरून इन्कम सुरू होईल, असं आश्वासन पायलट यांनी दिले आहे.

Congress NEWS
Amravati News: कुणाला उलट्या तर कुणाला पोटदुखी; अमरावतीतील MIDCत १०० कामगारांना अचानक विषबाधा

याआधी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी २ आश्वासने दिले आहेत. पहिली प्यारी दीदी योजना आणि दुसरी जीवन रक्षा योजना. प्यारी दीदी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा २,५०० रूपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तर जीवन रक्षा योजनेंतर्गत दिल्लीतील प्रत्येक रहिवाशांना २५ लाख रूपयांचा आरोग्य विमा दिला जाईल, असं आश्वासन काँग्रेस पक्षाकडून देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com