Delhi Assembly Elections 2025

Delhi Assembly Elections 2025 - दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ लोकसभा निवडणुकीनंतर यंदा दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ होत आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० मतदारसंघांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर ८ फेब्रुवारी २०२५ ला मतमोजणी होईल. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष, भाजप (BJP) आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष आमनेसामने आहेत. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली असून, ७० उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर भाजप आणि काँग्रेसनेही केजरीवालांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दिल्लीमध्ये साधारण दीड कोटी मतदार असून, त्यात ८० लाखांहून अधिक पुरूष, तर ७० लाखांहून अधिक महिला मतदार आहेत. तर जवळपास २ लाखांच्या आसपास नवमतदार असणार आहेत. १३ हजारांपेक्षा अधिक मतदान केंद्रावर ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com