Pravesh Varma NetWorth: केजरीवालांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा आहेत कर्जबाजारी; नावावर आहे तब्बल ६२ कोटींचे कर्ज

Pravesh Varma Net Worth: नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते प्रवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय. या प्रवेश वर्मा यांची एकूण संपत्ती जाणून घेऊ.
Pravesh Varma
indian express
Published On

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झालाय. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे दिग्गज नेत्यांचाही दारुण पराभव झालाय. यात अरविंद केजरीवाल याचाही सामावेश आहे. भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना चीतपट केलंय. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. २०१३ पासून केजरीवाल या जागेवरून निवडून येत होते. परंतु यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.

केजरीवाल यांना पराभूत करणाऱ्या वर्मा यांच्याबाबत एक मोठी धक्कादायक बातमी समोर आलीय. प्रवेश वर्मा यांच्यावर ६२ कोटींचं कर्ज आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार परवेश वर्मा यांच्याकडे एकूण ९५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्या मालमत्तेत शेतजमीन, गोदामे आणि घरे यांचा समावेश आहे. त्यांनी ७७.८९ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि १२.१९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केलीय.

Pravesh Varma
Delhi Assembly Election: दिल्लीचा विजय विकासाचा आणि सुशासनाचा; ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

त्यांच्याकडे त्याच्याकडे ३ कार आहेत - टोयोटा फॉर्च्युनर, टोयोटा इनोव्हा आणि महिंद्रा XUV अशी वाहने आहेत. त्याच्याकडे २०० ग्रॅम सोने असून त्याची किंमत ८.२५ लाख रुपये आहे. प्रवेश वर्मा यांच्या पत्नीकडे १७.५३ कोटी रुपयांची जंगम आणि ६.९१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. परवेश वर्मा यांच्यावर ६२.६० कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जामध्ये भाऊ सिद्धार्थ सिंगकडून घेतलेल्या २२.५९ कोटी रुपयांच्या वैयक्तिक कर्जाचाही समावेश आहे.

Pravesh Varma
Delhi Election: शॉर्टकट राजकारणाचे 'शॉर्ट सर्किट झालं', काँग्रेस आणि 'आप' ला पंतप्रधान मोदींनी झोडपलं

प्रवेश वर्मा यांच्या पत्नीच्या नावावरही ११.४५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक-२०२५ मध्ये भाजपने बहुमत मिळवले असून ४६ जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा ४०८९ मतांनी पराभव केला. दरम्यान निवडणूक प्रचारावेळी भाजपने दिल्लीकरांना मोठं-मोठ्या घोषणा केल्या. त्यातली काही ठळक घोषणा जाणून घेऊ.

दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रूपये

गर्भवती महिलांना २१ हजार

महिलांना बस प्रवास मोफत

वृद्धांना दरमहा २५०० रूपये पेन्शन

गरिबांना सिलेंडरवर ५०० रूपयांची सबसीडी

होळी आणि दिवाळीला एक एक सिलेंडर मोफत

२०० यूनिटपर्यंत वीज मोफत

दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी ३६ जागांची आवश्यकता आहे. भाजप या आकड्यापेक्षा खूप पुढे जात असल्याचे दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची कामगिरी खराब झालीय. आम आदमी पक्षाचे बडे नेते – अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती यांचा निवडणुकीत पराभव झालाय. आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार हा भाजपमधील सर्वात मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत प्रवेश वर्मा , भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, विजेंद्र गुप्ता यांची नावे आघाडीवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com