Delhi Assembly Election: दिल्लीचा विजय विकासाचा आणि सुशासनाचा; ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

Prime Minister Modi Reaction On Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झालाय. विधानसभेत प्रचारादरम्यान पंतप्रधान यांनी आप सरकारला 'आपदा' म्हणजेच 'आपत्ती', असं संबोधलं होतं.
Delhi Assembly Election
Prime Minister Modi Reaction On Delhi Assembly Electiongoogle
Published On

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवलाय. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झालाय. भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिलीय. दिल्लीच्या जनतेचे आभार मानत हा विकासाचा विजय झालाय. सुशासनाचा विजय झालाय. दिल्लीच्या विकासात आम्ही कोणतीच उणीव ठेवणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या एक पोस्ट लिहिलीय. या पोस्ट मध्ये त्यांनी आम्ही दिल्लीचा विकास करू असं म्हटलंय. जनशक्ती, सर्वोपरी! विकासाचा विजय झालाय. सुशासन जिंकलय. भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी दिल्लीतील बंधू आणि भगिनींचे आभार. तुम्ही जो आशीर्वाद आणि स्नेह दिलंय, त्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार. दिल्लीचा विकास करून येथील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. ही आमची गॅरंटी आहे. यासह विकसीत भारत निर्माण करण्यात दिल्लीची मोलाची भूमिका असेल.

Delhi Assembly Election
PM Narendra Modi: काँग्रेसकडून जातीवादाचं विष पेरलं जातंय; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

याचबरोबर पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांनाही शुभेच्छा दिल्यात. मला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा अभिमान आहे. भाजपला मोठं मताधिक्य मिळावे, यासाठी त्यांनी दिवस-रात्र काम केलं. आता अजून सक्षमपणे आम्ही दिल्लीकरांची सेवा, करू असं मोदी म्हणालेत.

भाजपच्या विजयावर काय म्हणाले अमित शहा

दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, लबाड शासनाचा अंत झालाय आणि विकास सुशासनाच्या युगाला सुरुवात झालीय. राजधानी दिल्लीच्या मतदारांनी विश्वासघात करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवलाय. जे लोक असे खोटी आश्वासने देत असतील त्यांच्यासाठी एक उदाहरण त्यांनी समोर ठेवलंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयावर बोलताना अमित शहांनी भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्यात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात दिल्ली अख्या जगात एक नंबरची राजधानी बनवू असा संकल्प आम्ही केलाय असं शहा म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com