Delhi Election Result : अखेर दिल्लीत कमळ फुललं...! 27 वर्षांनी दिल्लीत भाजपचा विजय, दारू घोटाळा 'आप'ला भोवला?

Delhi Election 2025 Result : दिल्लीत भाजपनं आपच्या गडाला सुरूग लावलाय. तब्बल २७ वर्षांनंतर भाजपनं दिल्लीतली सत्ता कशी मिळवली? काय होती रणनीती/ आपला नेमकं काय भोवलं? त्यावरचा विशेष रिपोर्ट
Delhi Election Result
Delhi Election ResultBJP India X
Published On

दिल्ली.. कधी काळी काँग्रेसचा अभेद्य गड असलेल्या दिल्ली विधानसभेत भाजपनं १२ वर्षांच्या आपच्या सत्तेला सुरूंग लावत तब्बल 27 वर्षानंतर भाजपचं कमळ पुन्हा फुललं आहे. भाजपच्या तुफान विजयी वादळात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना आपल्या जागाही वाचवता आल्या नाहीत. दिल्लीकरांनी या निवडणुकीत भाजपवर दाखवलेल्या विश्वासामुळे दिल्लीकरांची आता चांदी होणार आहे.

दिल्लीत कमळ फुललं, दिल्लीकरांना काय मिळालं ?

- दिल्लीतील महिलांना दरमहा 2500 रूपये मिळणार

- गर्भवती महिलांना 21 हजार

- महिलांना बस प्रवास मोफत

- वृद्धांना दरमहा 2500 रूपये पेन्शन

- गरिबांना सिलेंडरवर 500 रूपयांची सबसीडी

- होळी आणि दिवाळीला एक एक सिलेंडर मोफत

- 200 यूनिटपर्यंत वीज मोफत

दिल्लीत झालेल्या दारू घोटाळ्यामुळे आप सरकार वादात सापडलं होतं. इतकंच नाही तर मुख्यमंत्रिपदावर असताना अरविंद केजरीवालांना जेलवारी करावी लागली. त्यात ईडी आणि इतर तपास यंत्रणांचीही एन्ट्री झाली. व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा केजरीवालांनी प्रयत्न केला. मात्र भाजपनं मोठ्या खुबीनं केजरीवालांच्या या मुद्याला परतवून लावलं. केजरीवालांना नेमकं काय भोवलं ते पाहूयात.

Delhi Election Result
Delhi Election 2025 Memes : दिल्ली भाजपची, आपचा पत्ता कट; निवडणूक निकालानंतर मीम्सचा महापूर, बघून खळखळून हसाल

आपच्या पराभवाची कारणं

- 24 तास स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन अपूर्णच

- दिल्लीतील स्वच्छता व्यवस्था कोलमडली

- काँग्रेससोबत आघाडी न करणं भोवलं

- केजरीवालांसह प्रमुख नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

- केजरीवालांच्या निवासस्थानावर कोट्यवधी रुपयांचा खर्च

- विकासकामं डावलून मोफत वस्तू देण्याच्या घोषणांचा धडाका

यामुळे 'आप'ला पराभवाचा सामना करावा लागला.

Delhi Election Result
Delhi Election Results : केजरीवालांनी आईची खुर्ची खेचली, आता लेकाने बदला घेतला; दिल्लीच्या राजकारणात मोठा उलटफेर

दिल्लीतल्या मतदारांमध्ये आप आणि केजरीवाल कसे भ्रष्टाचारी आहेत हा संदेश पाठवण्यात भाजपला यश आलं आणि दिल्लीत आपवर झाडू फिरला. काँग्रेसच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करून केजरीवाल यांनी दिल्लीची सत्ता मिळवली होती. आता केजरीवाल यांना कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरूनच पायउतार व्हावं लागलंय. त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झालं.

Delhi Election Result
Maharashtra Politics : "त्यांचा चेहराच गंभीर आहे.." एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

भाजपची गेल्या १० वर्षांपासून देशात सत्ता आहे. मात्र राजधानी दिल्लीतच सत्ता नसल्यामुळे भाजपच्या मनात मोठी सल होती. अखेर दिल्लीच्या तख्तावर भाजप पूर्णपणे विराजमान झालय. त्यामुळे भाजपवर अपेक्षापूर्तीचं मोठं ओझं असणार असून आता दिल्ली विकासात अडथळ्याची भाषा भाजपला करता येणार नाही.

Delhi Election Result
Devendra Fadnavis : अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा ठाकरेंना शब्द दिला होता का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, "त्यांनी रंग.."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com