Delhi Election Results : केजरीवालांनी आईची खुर्ची खेचली, आता लेकाने बदला घेतला; दिल्लीच्या राजकारणात मोठा उलटफेर

Delhi Assembly Election Results 2025 : नवी दिल्ली मतदारसंघात भाजपचे परवेश सिंह वर्मा यांनी आपचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. केजरीवाल यांचा १२,००० मतांनी पराभव झाला आहे.
Delhi Assembly Election Results 2025
Delhi Assembly Election Results 2025 Saam Tv
Published On

Delhi Assembly Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच भाजपाने आघाडी घेतली आहे. दिल्लीच्या विधानसभेच्या ७० जागांपैकी ४४ जागांवर भाजपने आघाडी मिळवली आहे. तर आप २६ जागांवर आहे. दिल्लीत आपला मोठा धक्का बसला आहे. कारण माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा त्यांच्या मतदारसंघात पराभव झाला आहे.

अण्णा हजारेंच्या लोकपाल बिल आंदोलनामध्ये अरविंद केजरीवाल यांचा चेहरा समोर आला होता. तेव्हा दिल्लीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. शीला दीक्षित या तेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. सलग १५ वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर असलेल्या शीला दीक्षित यांच्यावर केजरीवाल यांनी भष्ट्राचाराचे अनेक आरोप केले होते. पुढे आपची स्थापना झाल्यानंतर २०१३ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले.

नवी दिल्ली हा अरविंद केजरीवाल यांचा मतदारसंघ आहे. या निवडणुकीत केजरीवाल पिछाडीवर होते. त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे संदीप दीक्षित यांनी घेतलेली मते केजरीवाल यांच्यासाठी त्रासदायक ठरले आहेत. संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत. संदीप दीक्षित मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Delhi Assembly Election Results 2025
Delhi CM: दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? या ५ नेत्यांची नावे चर्चेत

नवी दिल्ली मतदारसंघात भाजपचे परवेश सिंह वर्मा यांचा विजय झाला आहे. तर अरविंद केजरीवाल यांचा १२०० मतांनी पराभव झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संदीप दीक्षित यांना ३ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. दीक्षित यांनी खेचलेल्या मतांमुळे केजरीवाल पिछाडीवर गेले असल्याचे म्हटले जात आहे.

Delhi Assembly Election Results 2025
Delhi Election Results : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत, दिल्लीत आपला जोरदार धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com