Delhi Election Results : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत, दिल्लीत आपला जोरदार धक्का

Arvind Kejriwal Defeated in Delhi : राजधानी दिल्लीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने ४८ जागांवर आघाडी घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा धक्का बसलाय.
Arvind Kejriwal Defeated in Delhi
Arvind Kejriwal Defeated in Delhi
Published On

New Delhi Assembly Constituency : दहा वर्षानंतर दिल्लीत आपच्या सत्तेला सुरूंग लागलाय. आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा जोरदार धक्का बसलाय. नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल यांचा १२०० मतांनी पराभव झालाय. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा दारूण पराभव केलाय. मनिष सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसलाय. मुख्यमंत्री अतिशी पिछाडीवर आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला जोरदार झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा १२०० मतांनी पराभव झालाय. भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी दणदणीत विजय मिळवला. संदीप दीक्षित यांच्यामुळेच केजरीवाल यांचा पराभव केल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. संदीप दीक्षित यांनी ३ हजारांपेक्षा जास्त मते या मतदारसंघात घेतली आहेत.

Arvind Kejriwal Defeated in Delhi
Delhi Assembly Election: दिल्लीतील मुस्लिम बहुल मतदारसंघ कुणाच्या बाजूनं? आप, काँग्रेस की भाजप?

विधानसभा निवडणुकीच्या आधी अरविंद केजरीवा यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्याची धुरा आतिशी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पण आजी आणि माजी मुख्यमंत्री पराभवाच्या छायेत आहेत. आतिशी यांचाही पराभव होईल, असे चित्र दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीआधी स्वत:ला मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते. पण दिल्लीमध्ये आपचा आणि अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय. २७ वर्षानंतर भाजप पुन्हा दिल्लीमध्ये सत्तेत बसणार आहे.

Arvind Kejriwal Defeated in Delhi
Delhi CM: दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? या ५ नेत्यांची नावे चर्चेत

दिल्लीत कमळ फुलले

राजधानी दिल्लीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत आपचा दारूण पराभव केला. ७० जागांपैकी भाजपने ४७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर आप फक्त २३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com