Delhi Assembly Election: दिल्लीतील मुस्लिम बहुल मतदारसंघ कुणाच्या बाजूनं? आप, काँग्रेस की भाजप?

Delhi Vidhan Sabha Results 2025: दिल्लीतील मुस्लिम बहुल मतदारसंघ कुणाच्या बाजूनं आहेत? मुस्लिम मतदार पुन्हा एकदा आपच्या बाजूनं जाणार की, भाजप/ काँग्रेसची निवड करणार?
Muslim constituency
Muslim constituencyyandex
Published On

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलांनुसार, भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आहे. ४२ जागांवर भाजप आघाडीवर आहेत तर, आप २७ जागांवर आघाडीवर आहे. तर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहेत.

आप आणि काँग्रेसने २०२४च्या लोकसभा निवडणुका एकत्र लढवल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये आपने स्वबळाचा नारा दिला होता. दोघांची लढत मुस्लिम बहुल मतदारसंघाच्या जागांवर होती. दिल्लीतील ७० मतदारसंघापैकी ७ जागा अशा आहेत, जिथे मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका बजावतात. मतिया महल, बाबरपूर, सीलमपूर, ओखला, मु्स्तफाबाद, चांदणी चौक आणि बल्लीमारन. या जागांवर आपचं लक्ष होतं. या जागांवर कुणाचं पारडं जड ठरणार? हे काही तासात स्पष्ठ होईल.

विधानसभा निवडणुकीसाठी आप, भाजप आणि काँग्रेसनं मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने दिली होती.

भाजपची मोठी आश्वासने

महिलांना दरमहा २,५०० रूपये मानधन देण्याची घोषणा.

गरीब महिलांना एलपीजी सिलेंडरवर ५०० रूपयांचे अनुदान. होळी आणि दिवाळीला एक सिलेंडर मोफत.

मातृ सुरक्षा वंदन योजनेंतर्गत ६ पोषण किट्स.

गर्भवती महिलांना २१ हजार रूपये.

वंचितांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ.

६० ते ७० वयोगटातील ज्येष्ठ नागरीकांची पेन्शन २००० रूपयांवरून २५०० रूपये करण्यात येईल.

७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, विधवा, निराधार महिलांचे पेन्शन २५०० रूपयांवरून ३००० रूपये करण्याचे आश्वासन.

Muslim constituency
Amol Mitkari: महाराष्ट्र हादरला! बुलढाण्यात चिमुकलीवर अत्याचार; मिटकरींकडून आरोपीचा थेट एन्काऊंटर करण्याची मागणी

आप पक्षाने दिलेली आश्वासने

महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना दरमहा २१०० रूपये मिळतील.

संजीवनी योजने अंतर्गत वृद्धांसाठी मोफत उपचार.

ऑटो चालकांच्या कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी १ लाख रूपयांची मदत.

दलित विद्यार्थ्यांसाठी आंबेडकर शिष्यवृत्ती.

पुजाऱ्यांना दरमहा १८ हजार रूपये दिले जाणार.

Muslim constituency
Goma city violence: बंडखोरांच्या समूहाचं जगाला हादरवणारं कृत्य; शेकडो कैदी महिलांवर अत्याचार,अनेकांना जिवंत जाळलं

दिल्लीकरांना काँग्रेसची मोठी आश्वासने

प्यारी दीदी योजने अंतर्गत, प्रत्येक महिलेला दरमहा २५०० रूपये देण्याचे आश्वासन.

जीवन रक्षा योजने अंतर्गत प्रत्येक दिल्लीवासीयांना २५ लाखांपर्यंत मोफत उपचार.

महागाई मुक्ती योजने अंतर्गत ५०० रूपयांना सिलिंडर आणि मोफत रेशन किट.

मोफत वीज योजने अंतर्गत ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन.

बेरोजगार तरूणांना एका वर्षासाठी दरमहा ८,५०० रूपये देण्याचे आश्वासन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com