Amol Mitkari: महाराष्ट्र हादरला! बुलढाण्यात चिमुकलीवर अत्याचार; मिटकरींकडून आरोपीचा थेट एन्काऊंटर करण्याची मागणी

Amol Mitkari reaction: अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी बुलढाणा प्रकरणात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीचा थेट एन्काऊंटर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
NCP Leade Amol Mitakri
NCP Leade Amol MitakriGoogle
Published On

४ वर्षीय चिमुकलीवर २१ वर्षीय नराधम चुलत काकानं लैंगिक अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूणकी गावात घडली आहे. चिमुकलीची प्रकृती गंभीर असून, ४० टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी रूग्णालयात जात पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर परिसरातील नागरीकांसह राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर अमोल मिटकरी यांनी रुग्णालयात जात पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच आरोपीचा एन्काऊंटर करण्यात यावा, अशी थेट मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

NCP Leade Amol Mitakri
Gold Purity Check: सोन्याचे दागिने खरे की बनावट ओळखण्याचा सोपा मार्ग; एक ॲप करेल लाखमोलाचं काम, जाणून घ्या

'पीडित मुलीच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला, जवळपास दीड महिना लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण आरोपीचा थेट एन्काऊंटर करण्यात यावा', अशी मागणी अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

NCP Leade Amol Mitakri
Crime News: भयंकर! शौचालयाला जाताना गरोदर महिलेची वाट अडवली, अत्याचारानंतर धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकलं

नेमकं प्रकरण काय?

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूणकी गावात ४ वर्षीय चिमुकलीवर तिच्या चुलत काकाने लैंगिक अत्याचार केला आहे. चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असून, जवळपास ४० टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी मध्यप्रदेशमधील सुनील निगवाले या आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com