.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोने चांदीच्या दागिन्यांची आवड प्रत्येकाला असते. भारतात सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. मात्र, अनेकदा ग्राहकांची सोनं खरेदी करताना फसवणूक होते. तसेच हजार किंवा लाख रुपयांचे नुकसान होते. जर हीच फसवणूक आपल्याला टाळायची असेल तर, आपण एक सरकारी ॲपची मदत घेऊ शकता. भारतीय मानक ब्युरोने एक अॅप लाँच केले होते. या ॲपद्वारे आपण सोने खरे आहेत की बनावट हे ओळखू शकता.
या ॲपद्वारे आपण आयएसआय आणि हॉलमार्क-प्रमाणित सोने आणि चांदीचे दागिने खोटे आहेत की बनावट हे तपासू शकता. सध्या सोन्याच्या दागिन्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. अशातच बनावट सोन्याचे दागिने देऊन आपली फसवणूक कुणी करू नये यासाठी आपण बीआयएस केअर अॅपची मदत घेऊ शकता.
सोने खरे आहे की बनावट कसे ओळखाल?
बीआयएस केअर अॅपद्वारे, वापरकर्ते हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासू शकतात. हे अॅप अँड्रॉइड आणि अॅपल आयफोनच्या गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. बीआयएस वेबसाइटच्या एफएक्यूनुसार, सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग १४ के, १८ के, २० के, २२ के, २३ के आणि २४ के अशा ६ श्रेणींमध्ये करण्यात येते.
या अॅपद्वारे, कोणत्याही वस्तूवरील आयएसआय मार्क, हॉलमार्क आणि सीआरएस नोंदणी चिन्हाची सत्यता पडताळता येते. यासाठी परवाना क्रमांक/HUID क्रमांक/नोंदणी क्रमांक ॲपमध्ये प्रविष्ट करा. त्यांनतर उत्पादकाचे नाव आणि पत्ता, परवाना किंवा नोंदणी वैधता, परवाना किंवा नोंदणी क्रमांक इत्यादी सर्व तपशील मिळतील.
हॉलमार्क केलेल्या दागिन्यांच्या वस्तू HUID क्रमांकाने ओळखता येतात. HUID म्हणजे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. आपण दुकानातून दागिने खरेदी करता, तिथून आपल्याला या कोडबद्दल माहिती मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.