Yavatmal Crime: धक्कादायक! आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; १६ वर्षांची मुलगी राहिली गरोदर

Ghatanji Yavatmal Crime News: सोळा वर्षीय कर्णबधीर मुलीवर २० वर्षीय तरूणानं लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाणे परिसरात घडली आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

सोळा वर्षीय कर्णबधीर मुलीवर एका २० वर्षीय तरूणानं लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरीकांनी रोष व्यक्त केलाय. क्षणार्थ ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली आहे.

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका सोळा वर्षीय कर्णबधिर मुलीवर एका २० वर्षीय तरूणानं लैंगिक अत्याचार केला आहे. मुख्य म्हणजे अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची बाब समोर आली आहे. मुलीची बदनामी होऊ नये म्हणून पीडित मुलीच्या पालकांनी ही बाब उघडकीस आणली नव्हती. मात्र, मुलीला रूग्णालयात दाखल केल्यानंतर घडलेला सर्व प्रकार उघडकीस आला.

Crime News
Tribal Development: आदिवासी विद्यार्थी अडचणीत, समस्या जाणून घेण्यासाठी भाजपचे आमदार -खासदार आश्रम शाळेत मुक्कामी

नेमकं प्रकरण काय?

गावातील एका २० वर्षीय मुलानं आधी कर्णबधिर अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. नंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपी तरूण वारंवार अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. मात्र, जेव्हा पीडित मुलीला वेदना झाल्या, तब्येत बिघडली तेव्हा तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं समोर आलं.

Crime News
Shivendraraje Bhosale: सोलापूरकर महाराष्ट्र पेटवण्याचं उद्योग करतायेत, त्यांना माफी नाहीच; शिवेंद्रराजे भोसले संतापले

मुलीची बदनामी होऊ नये यासाठी पालकांनी एक महिने ही बाब लपवली होती. मात्र, मुलगी गरोदर असल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबाला विश्वासात घेऊन तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. तसेच आरोपीविरुद्ध पॉक्सोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पुढील तपास पांढरकवडा पोलीस उपविभागीय अधिकारी आणि पारवा ठाणेदार हे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com