Tribal Development: आदिवासी विद्यार्थी अडचणीत, समस्या जाणून घेण्यासाठी भाजपचे आमदार -खासदार आश्रम शाळेत मुक्कामी

Tribal Development: मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेून ७ फेब्रुवारीला आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय ते मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी शासकीय आश्रमशाळेत एक दिवस मुक्काम करणार आहेत.
Tribal News
Tribal NewsSaam Tv News
Published On

राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेून ७ फेब्रुवारीला आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय ते मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी शासकीय आश्रमशाळेत एक दिवस मुक्काम करणार आहेत. यात मंत्री उईके आश्रमशाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणारा आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासोबत आश्रमशाळेतील मूलभूत सोई - सुविधांची पाहणी करणार आहेत.

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४९७ शासकीय आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळेत सुमारे २ लाख अनुचित जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व आश्रमशाळांमध्ये आदिवासी आयुक्तालय, आदिवासी विकास महामंडळ, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, अपर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालयातील अधिकारी एक दिवसासाठी मुक्कामी राहणार असून, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

Tribal News
Maharashtra Politics: शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स, कधीही कापला जाईल; संजय राऊतांचा टोला

वरिष्ठ स्तारावरून अधिकाऱ्यांच्या भेटीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळेत पूर्णवेळ उपस्थित राहून सोयी सुविधांची तपासणी करणार आहेत.

दरम्यान, मुक्कामी असलेले अधिकारी विद्यार्थ्यांची संवाद साधून तपासणी करून अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहेत. अहवालाचे अवलोकन केल्यानंतर शाळानिहाय कृती कार्यक्रम तयार करून अभिप्रायासह सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना आयुक्त कार्यालयामध्ये सादर करावे लागेल. या उपक्रमामुळे राज्यातील शासकीय आश्रमशाळांच्या विकासाला चालना मिळेल.

Tribal News
Shatrughan Sinha: संपूर्ण देशात नॉनव्हेजवर बंदी घातली पाहिजे; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य

यासंदर्भात मंत्री अशोक उईके यांनी माहिती दिली आहे. 'या उपक्रमाद्वारे शिक्षणाच्या सुविधा, वसतिगृहांची स्थिती, अन्न व पोषण, आरोग्य व्यवस्था यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. नंतर त्वरित उपाययोजना केली जाणार. राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी हा उपक्रम पुढे नेण्याचा सरकारचा मानस आहे. फक्त पाहणी करण्यापुरता उपक्रम मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी प्रभावी निर्णय घेण्यात येतील.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com