
तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे नेहमी त्यांच्या विधानावरून चर्चेत असतात. त्यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे राजकीय तसेच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी मांसाहाराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, भारतात मांसाहारावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, देशात समान नागरी संहिता कायदा लागू करण्याबाबतही त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
संसदेबाहेर बोलताना माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी मांसाहाराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले,'देशाच्या अनेक भागात गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. मला वाटतं की, गोमांसच नाही तर, सर्वसाधारणपणे मांसाहार पदार्थांवरही बंदी घालण्यात यावी.
दरम्यान, ईशान्यातील काही राज्यांसह काही ठिकाणी गोमांस खाणं कायदेशीर आहे. वहाँ खाओ तो यम्मी, पर नॉर्थ इंडिया में खाओ तो मम्मी. पण असं केल्यानं काही होणार नाही. ठराविक नाही तर सगळीकडे बंदी आणली पाहीजे', असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
शत्रुघ्न सिन्हा यांचा यूसीसीला पाठिंबा
शत्रुघ्न सिन्हा यांनी यूसीसीला पाठिंबा दर्शवला आहे. 'उत्तराखंडमध्ये यूसीसीसची अंमलबजावणी म्हणजे कौतुकास्पद आहे. देशात यूसीसी निश्चितच लागू करायला हवं. मला खात्री आहे, माझ्याशी सर्वजण सहमत असतील. पण यात अनेक बारकावे आणि त्रुटी आहेत. त्यामुळे यूसीसी तरतुदींचा मसुदा तयार करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी. या विषयावर प्रत्येकाचं मत आणि सल्ला घेणं गरजेचं असल्याचं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
२०१८ साली शेवटचा सिनेमा
२०२४च्या लोकसभा निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालच्या आसनसोलमधील जागा जिंकली होती. त्यांनी भाजपच्या सुरिंदरजीत सिंग अहलुवालिया यांचा ५९ हजार ५६४ मतांनी पराभव केला होता. शत्रुघ्न सिन्हा यांनी२०१८ साली यमला पगला दीवाना अगेन या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला. ते आता सध्या राजकारणात सक्रिय आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.