Rahul Solapurkar: ''आम्ही डोम कावळ्यांना ओळखत नाही''; राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यावर शरद पवार गटाचा नेम

Rahul Solapurkar: मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत मोठं विधान केलं होतं. याच विधानावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील आमदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rashtrawadi on Solapurkar
Rashtrawadi on SolapurkarSaam Tv News
Published On

ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सोलापूरकरांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळासहित सिनेसृष्टीत प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनीही राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली होती. राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यानंतर सिनेसृष्टीत सुरु झालेल्यावर वादावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. आम्ही डोम कावळ्यांना ओळखत नाही, असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर विधान केल्यानंतर दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोलापूरकर यांनी स्वस्तातले इतिहासाचार्य म्हटलंय. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा डोम कावळ्यांना आम्ही ओळखत नाही. उदयनराजे भोसले यांनी जी भाषा वापरली ती योग्य आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Rashtrawadi on Solapurkar
Beed Crime News: बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! हॉटेलमध्ये घुसून बेदम मारहाण, तरुण गंभीर जखमी; VIDEO व्हायरल

राहुल सोलापूरकर यांनी शाहू महाराजांच्या चित्रपटात काय काम केलं आहे. म्हणून तो काही थोर झाला आहे का? भांडारकर इन्स्टिट्यूटमधून त्याला पहिलं हाकललं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत या मनुवाद्यांना त्रुटी कशी दिसते. दर सहा महिन्याला महाराजांबद्दल बोलतो. इतिहास वाचा. इतिहास समजण्याचा विषय असतो, लोक काहीही बोलत राहतात, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Rashtrawadi on Solapurkar
Maharashtra politics: मुंडेंना पदावरून काढले तरच सरकारची इज्जत राहील; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची खरमरीत टीका

राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केली दिलगिरी

लाच शब्द वापरल्याबद्दल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या व्यक्तव्यावरून जाहीरपणे माफी मागितली आहे. 'साम, दाम, दंड, भेद, या चारही बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज मोठे राज्यकर्ते होऊन गेले आहेत. मी वेगळं काही सांगायची गरज नाही. छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थित पार पाडली होती. सगळा इतिहास अभ्यासून. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतची अनेक व्याख्यानं दिली आहेत.

छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचं माझ्या मनातही येऊ शकत नाही. कुणीतरी त्या पॉडकास्टमधली २ वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असं व्हिडिओ व्हायरल केला. ज्यामुळे गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला आहे, असं राहुल सोलापूरकर यांनी व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com