Shivendraraje Bhosale: सोलापूरकर महाराष्ट्र पेटवण्याचं उद्योग करतायेत, त्यांना माफी नाहीच; शिवेंद्रराजे भोसले संतापले

Rahul Solapurkar Controversy: 'सोलापूरकर महाराष्ट्र पेटवण्याचं उद्योग करतायेत, त्यांना माफी नाहीच'. शिवेंद्रराजे भोसले यांनी सोलापूरकर यांच्यावर टीका करत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Bhosale on Solapurkar
Bhosale on SolapurkarSaam Tv News
Published On

ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर हे गेले काही दिवस छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. फक्त सिनेसृष्टी नसून, राजकीय वर्तुळातूनही त्यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. अशातच भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका करत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल सोलापूरकर हे महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहेत, त्यांना माफी नाहीच, असं भोसले म्हणाले.

कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे

'आपलं भवितव्य विझायला लागलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वक्तव्य करणं ही फॅशन झाली आहे. राहुल सोलापूरकर हे महाराष्ट्र पेटवण्याचं उद्योग करत आहेत. त्यांची उतरता कळा सुरू झाली असेल किंवा त्याचं भवितव्य विझायला लागलं असेल. त्यामुळे प्रकाशझोतात येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केलं की आपली चर्चा होते', अशी टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

'सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी नाही. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अशी बेताल वक्तव्य करणार्‍यांवर सरकारने कारवाई लवकरात लवकर करावी, याची सुरूवात सोलापूरकर यांच्यापासून करावी', अशी मागणी देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारकडे केली आहे.

Bhosale on Solapurkar
Shatrughan Sinha: संपूर्ण देशात नॉनव्हेजवर बंदी घातली पाहिजे; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य

राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले?

राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केल्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज हे लाच देऊन आग्र्यातून सुटले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाचा वजीर आणि त्यांच्या बायकोलाही लाच दिल्याचे पुरावे इतिहासात आहेत.

मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदारकडून सही शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले होते. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले होते. त्याची खूण आणि पुरावे देखील आहेत,' असं राहुल सोलापूरकर म्हणाले एका मुलाखतीत म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com