Nagpur Bird Flu: राज्यात बर्ड फ्लूची चाहूल, ३ हजार कोंबड्यांना जमिनीत पुरल्या; प्रशासन अलर्ट

Bird Flu Alert in Nagpur: नागपुरातील ताजबाग येथील यासीन प्लॉट परिसरात ३ कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर ३ हजार ५४ कोंबड्या जमिनीत पुरल्या आहेत.
Bird Flu
Bird FluSaam tv
Published On

नागपुरात बर्ड फ्लू संदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. नागपुरातील ताजबाग येथील यासीन प्लॉट परिसरात ३ कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानं प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ३ हजार ५४ कोंबड्या जमिनीत पुरल्या आहेत. तसेच त्यांचे एक किलोपेक्षा जास्त खाद्यही नष्ट करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताजबाग परिसरातील यासीन प्लॉट भागात एका चिकन सेंटरमधील ३ कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर बर्ड फ्लूच्या संशयानं पशुसंवर्धन विभागानं त्याचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यानंतर मिळालेल्या अहवालात ताजबाग परिसरातील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं समोर आलं.

Bird Flu
Yavatmal Crime: धक्कादायक! आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; १६ वर्षांची मुलगी राहिली गरोदर

त्यानंतर नियमानुसार पशुसंवर्धन विभागानं यासिन प्लॉटच्या अवतीभवतीचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केलाय. महापालिकेच्या आरोग्य विभागाने बर्ड फ्लूच्या नियमानुसार त्या परिसरातील ३ हजार ५४ कोंबड्या जमिनीत पुरल्या आहेत. तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण केलंय. तर, बर्ड फ्लूमुळे मृत्यू पावलेल्या कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्यांना Tamifluचं औषध देण्यात आलंय.

Bird Flu
Shivendraraje Bhosale: सोलापूरकर महाराष्ट्र पेटवण्याचं उद्योग करतायेत, त्यांना माफी नाहीच; शिवेंद्रराजे भोसले संतापले

चंद्रपूरात बर्ड फ्लूची एन्ट्री

महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्येही बर्ड फ्लूच्या एन्ट्रीनंतर प्रशासन सर्तक झालंय. चंद्रपुरातील मांगली गाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित केलंय. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात आदेश दिले आहेत.

२५ जानेवारीला मांगली गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि डीडीएमए अध्यक्षांनी मांगली गाव आणि १० किमीपर्यंतचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com