Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv

Maharashtra Politics : "त्यांचा चेहराच गंभीर आहे.." एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
Published on

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वपूर्ण बेठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला काही वैयक्तिक कारणांमुळे शिंदे गैरहजर राहिले होते. यामुळे शिंदे महायुतीत नाराज आहेत अशा चर्चा व्हायला लागल्या. दरम्यान या नाराजीच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आज पुण्यात जयपूर डायलॉग्सच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेव्हा फडणवीस यांनी नाराजीच्या चर्चांवर भाष्य केले. ते म्हणाले, "या चर्चांमुळे माझे मनोरंजन होते. परवा आमची एक बैठक होती. या बैठकीला एकनाथ शिंदे येणार होते. सकाळी त्यांचा फोन आला. ते म्हणाले, माझ्या पत्नीची प्रकृती खराब आहे, त्यामुळे मला बैठकीला येणे शक्य होणार नाही. त्यावर मी ठिक आहे. तुम्ही बैठकीला येऊ नका असे म्हटले."

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा ठाकरेंना शब्द दिला होता का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, "त्यांनी रंग.."

"बैठकीनंतर एकनाथ शिंदे नाराज, शिंदे बैठकीला नाही आले अशा चर्चा व्हायला लागल्या. एकनाथ शिंदे यांचे व्यक्तिमत्व धीर-गंभीर स्वरुपाचे आहे. तुम्हाला ते खूप कमी वेळा हसताना दिसले असते. त्यांचे हसणारे फोटो आहेत. पण ते नॉर्मली कमी हसतात. त्याचा चेहरा गंभीर आहे. ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचा चेहरा तसाच होता. उपमुख्यमंत्री बनले आताही त्यांचा चेहरा तसाच आहे. आता त्यांचा गंभीर चेहरा दाखवून ते नाराज आहे अशा चर्चा पसरवल्या जातात" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Delhi Election 2025 Result : दिल्लीत 'आप'ला दणका! विधानसभेच्या निकालावर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबतही स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "आम्ही सरकार बनवू शकतो हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रंग बदलला. माझा फोन देखील उचलला नाही. निकाल आल्यानंतर त्यांनी सोबत पत्रकार परिषद घेण्याऐवजी एकट्याने पत्रकार परिषद घेतली. जर मुख्यमंत्रीपदाबाबत काही ठरलं असेल, तर त्याची किमान चर्चा त्यांनी केली असती. शरद पवार यांच्यासोबत जायचं हे उद्धव ठाकरे यांचे निवडणूक आधीच ठरले होते,"

Devendra Fadnavis
Delhi Election Results : केजरीवालांनी आईची खुर्ची खेचली, आता लेकाने बदला घेतला; दिल्लीच्या राजकारणात मोठा उलटफेर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com