Artist Death : मनोरंजन विश्वावर शोककळा, सोशल मीडिया स्टारनं घेतला अखेरचा श्वास

Artist Passes Away : प्रसिद्ध सोशल मीडिया कलाकाराचे निधन झाले आहे. मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली. कलाकाराविषयी जाणून घेऊयात.
Artist Passes Away
Artist Deathsaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध कलाकाराचे निधन झाले.

प्रसिद्ध कलाकार सोशल मीडियावर 'गुंडा बिनू' या नावाने ओळखला जात होता.

लोकप्रिय मिमिक्री कलाकाराने अखेरचा श्वास घेतला.

सोशल मीडियावर 'गुंडा बिनू' म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे लोकप्रिय मिमिक्री कलाकार शरथ उन्नीथन (Sharath Unnithan Death) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत असतानाच ते अचानक कोसळले. अभिनेत्री स्नेहा श्रीकुमार हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही दुःखद बातमी शेअर केली आहे.

स्नेहा श्रीकुमार यांची भावुक पोस्ट

अभिनेत्री स्नेहा श्रीकुमार यांनी एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे, "अतिशय जड अंतःकरणाने आम्ही तुम्हाला कळवत आहोत की, आमचा प्रिय मित्र शरथ उन्निथन- जो अलाप्पुझा जिल्ह्यातील कट्टनम, मूनमक्कुरु, वत्तिकुलम येथील मूळ रहिवासी होता आणि जो सध्या अमेरिकेत कार्यरत होता, त्याचे अमेरिकेतच निधन झाले आहे. शरथ उन्निथन याने 'गुंडा बिनू' या नावाने सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली होती आणि त्याचे रील्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. तो एक मिमिक्री कलाकार देखील होता आणि त्याने 'कोचीन गिनीज' व 'तिरुवनंतपुरम सारिगा' यांसारख्या समूहांसोबत सादरीकरण केले होते. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली..."

शरथ उन्नीथन कोण होते?

TOI ने 'एशियानेट न्यूज'च्या दिलेल्या वृत्तानुसार, शरथ उन्नीथन हे अलाप्पुझा जिल्ह्यातील कट्टनम (Kattanam) येथील वत्तिकुलम (Vathikkulam) येथील रहिवासी होते. या कलाकाराला 'शॉर्ट व्हिडिओ रील्स'च्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली. त्यांची विनोदाची अनोखी शैलीने चाहत्यांना भुरळ घातली. त्यांच्या सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. शरथ यांनी 'गुंडा बिनू' या पात्राच्या भूमिका साकारत अनेक रील्स बनवल्या, ज्या तुफान व्हायरल झाल्या. या रील्समध्ये ते अनेकदा एका विशिष्ट वेशभूषेत दिसून येत असत. या वेशभूषेत मोठी मिशी, दाट भुवया आणि डोक्यावर बांधलेला रुमाल यांचा समावेश असे.

सोशल मीडियावरून प्रसिद्धी मिळण्यापूर्वी, शरथ यांनी अनेक नामांकित मिमिक्री समूहांसोबत काम केले होते.'कोचीन गिनीज' (Cochin Guinness) आणि 'तिरुवनंतपुरम सारिगा' (Thiruvananthapuram Sariga) यांसारख्या समूहांचा ते एक भाग होते. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच चाहते आणि कलाकार मंडळींना त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र शरथ उन्नीथन यांच्या मृत्यूचे नेमके कारण, अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेले नाही.

Artist Passes Away
Dhurandhar 2 : खऱ्या आयुष्यातही रणवीर सिंहचे पाकिस्तानशी आहे खास कनेक्शन, वाचून बसेल ४४० व्होल्टचा धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com