Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actress Passes Away : मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री विषयी जाणून घेऊयात.
Famous Actress Passes Away
Famous Actress Deathsaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले आहे.

अभिनेत्रीने वयाच्या ६६ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्री कर्करोगाशी लढा देत होती.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले. 'Sistas', 'Shameless' आणि 'The Young and the Restless' फेम ज्येष्ठ अभिनेत्री डी फ्रीमॅन (Dee Freeman Passes Away) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६६ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक काळापासून त्या कर्करोगाशी लढत होत्या. अखेर कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली.

अभिनेत्री डी फ्रीमॅन यांच्या कुटुंबाने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट करून ही दुःखद बातमी शेअर केली आहे. त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. अनेक चाहते आणि नेटकऱ्यांनी 'कमेंट सेक्शन'मध्ये अभिनेत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच कलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्रीने २ एप्रिल २०२६ रोजी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले?

"अत्यंत गहिवरलेल्या अंतःकरणाने आम्ही सांगत आहोत की, कर्करोगाशी दिलेल्या निर्भीड लढ्यानंतर २ एप्रिल २०२६ रोजी 'डी' (Dee) यांचे निधन झाले आहे. या लढ्यादरम्यान 'डी'ला ज्यांनी ज्यांनी आधार दिला, त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. कितीतरी लोक त्यांची काळजी करतात आणि त्यांना साथ देतात, हे जाणून त्यांना खूपच भारावून गेल्यासारखे वाटले होते. आम्हाला खात्री आहे की, स्वर्गातही 'डी' त्यांच्या उत्स्फूर्त आणि चैतन्यमय स्वभावाने वावरत आहेत. 'डी' तुम्हाला शांती लाभो..."

डी फ्रीमॅन कोण होत्या?

TOI ने दिलेल्या माहितीनुसार, डी फ्रीमॅन यांचा जन्म १९५९ मध्ये लुईझियाना येथे झाला होता. हायस्कूलचे शिक्षण पूर्ण होताच त्या 'मरीन कॉर्प्स'मध्ये दाखल झाल्या. आपली लष्करी सेवा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी सुरुवातीला रंगभूमीवर काम केले आणि हळूहळू टीव्ही मालिका, चित्रपटांकडे गेल्या. गेल्या काही वर्षांत त्यांनी 'Shameless', 'NCIS: Los Angeles', 'Pretty the Series' अशा अनेक सुपरहिट प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. त्या शेवटच्या वेळी 'Sistas' या मालिकेत दिसल्या होत्या.

Famous Actress Passes Away
Dhurandhar 2 : ४८ डिग्री तापमान, २० दिवस शूटिंग; रणवीर सिंहने 'असा' शूट केला 'धुरंधर २'चा क्लायमॅक्स, किस्सा वाचून थक्क व्हाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com