रणवीर सिंहचा 'धुरंधर २' चित्रपट 19 मार्च 2026 ला रिलीज झाला.
'धुरंधर २' चा क्लायमॅक्स शूट करताना रणवीर सिंहची वाईट अवस्था झाली.
'धुरंधर २' चित्रपट आदित्य धर दिग्दर्शित आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये आदित्य धरच्या धुरंधर: द रिव्हेंजची चर्चा पाहायला मिळत आहे. 'धुरंधर २' ने जगभरात १,५०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. रणवीर सिंहचा 'धुरंधर २' चित्रपट 19 मार्च 2026 ला रिलीज झाला. रणवीर सिंगचा हा अॅक्शन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. प्रेक्षक चित्रपटातील दमदार ॲक्शन आणि थरारक दृश्यांचे कौतुक करत आहेत. मेकअप आणि प्रोस्थेटिक आर्टिस्ट करंदीप सिंग यांनी एका मीडिया मुलाखतीत, चित्रपटाचा भव्य क्लायमॅक्स ज्या कठीण परिस्थितीत चित्रित करण्यात आला, त्याबद्दल सांगितले.
करंदीप सिंग यांनी सांगितल्यानुसार, 'धुरंधर २' च्या टीमने क्लायमॅक्स सीनच्या चित्रीकरणासाठी अंदाजे १५ ते २० दिवस घालवले. हे चित्रीकरण लुधियानाच्या बाहेरील भागात अत्यंत कठीण परिस्थितीत शूट करण्यात आले. जेथे तापमान सुमारे ४७ ते ४८ अंश होते. आजूबाजूला कुठेही एकही झाड किंवा सावली नव्हती. लोकेशनमुळे अडचणी खूप वाढल्या होत्या. ॲक्शन सीन्सचे चित्रीकरण धातूचे कंटेनर्स, गाड्या आणि उभ्या असलेल्या मालगाड्यांनी वेढलेल्या एका औद्योगिक परिसरात करण्यात आले. ज्यामुळे खूप उष्णता उसळत होती.
ॲक्शन सीक्वेन्स दरम्यान जळत्या कंटेनर्सवरून उडी मारताना रणवीर सिंहने जड पठाणी सूट, त्यावर लेदर जॅकेट आणि ओव्हरकोट घातला होता, ज्यामुळे अभिनेत्याला देखील अनेक संकटांना सामोरे जावे लागले. शूटिंगदरम्यान वापरलेल्या बनावट रक्ताबद्दल ते म्हणाले, "आम्ही रणवीरवर एका आठवड्यात रक्ताची संपूर्ण एक बादली वापरली. पण एवढ्या उष्णतेतही रणवीरने पूर्ण शांतपणे संपूर्ण शूटिंग केले. त्याने एक जड विगसुद्धा घातला होता. एवढ्या प्रचंड उष्णतेतही रणवीरने दमदार अभिनय दिला."
'धुरंधर २' हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. यात हिंदीसोबत कन्नड, मल्याळ, तमिळ, तेलुगु यांचा समावेश आहे. 'धुरंधर 2' चित्रपटाची कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे. 'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. 'धुरंधर' मध्ये रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.