Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, सिनेसृष्टीवर शोककळा

Famous Actor Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ४२ वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. अभिनेत्याविषयी जाणून घेऊयात.
Famous Actor Passes Away
Famous Actor Deathsaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे.

कर्करोगाशी झुंज देताना अभिनेत्याचा मृत्यू झाला.

अभिनेत्याने वयाच्या ४२ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. 'Blue Bloods' या ड्रामातून प्रसिद्ध झालेला अभिनेता आणि विनोदवीर एलेक्स डुओंग (Alex Duong) याचे निधन झाले आहे. वयाच्या ४२ वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्याची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि त्याचे निधन झाले.

'US Daily' च्या वृत्तानुसार, एलेक्स डुओंग याचे शनिवार २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सांता मोनिका येथील सेंट जॉन रुग्णालयात निधन झाले. आदल्या दिवशी 'सेप्टिक शॉक' (septic shock) आल्यामुळे अभिनेत्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. आपल्या कुटुंबीयांच्या आणि मित्रपरिवाराच्या सानिध्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या मृत्यू नंतर कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

या वृत्तानुसार, २०१५ मध्ये ॲलेक्सला 'अल्व्हिओलर रॅब्डोमायोसारकोमा' (alveolar rhabdomyosarcoma) या कर्करोगाचे निदान झाले होते. हा कर्करोगाचा खूप भयंकर आहे. त्याचा परिणाम शरीरातील सॉफ्ट टिश्यूवर होतो. यामुळे शरीरात अनेक गंभीर गुंतागुंती निर्माण झाल्या. एलेक्सच्या पश्चात त्याची पत्नी क्रिस्टिना आणि पाच वर्षांची मुलगी एव्हरेस्ट आहेत.

एलेक्स डुओंग यांनी आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खूप हसवले आहे. त्याचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. एलेक्स डुओंग यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Famous Actor Passes Away
Salman Khan : 'मातृभूमी' चित्रपटानंतर भाईजानचा आणखी एक धमाका; नव्या सिनेमाची घोषणा, पहिला फोटो आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com