Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने खेचलं कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Sonali Bendre : बॉलिवूडमधील एव्हरग्रीन मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आजही चाहत्यांना फार आवडते. पण सध्या प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कायद्याच्या कचाकड्यात अडकली आहे.
Sonali Bendre
Sonali BendreSaam Tv
Published On

Sonali Bendre : मावळ तालुक्यातील उकसान येथील शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूडची प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत. स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करत संबंधित जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा केला आहे.

कुळकायद्यानुसार १९५७ पूर्वीपासून ताब्यात असलेल्या ३० गुंठे जमिनीवर हक्क असताना, खोट्या कागदपत्रांच्या आधारे हा हक्क डावलून जमीन सोनाली बेंद्रे आणि त्यांच्या पत्नी विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच जमिनीच्या ठिकाणी येऊन शिंदे कुटुंबांना दमदाटी केल्याचाही आरोप फिर्यादीची वकील वनराज शिंदे यांनी केला आहे. संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न आणि कुटुंबीयांना दमदाटी केल्याचाही आरोप आहे.

Sonali Bendre
Kapil Sharma: २० वर्षांच्या कारियरमध्ये केले फक्त ४ चित्रपट, एक हिट तीन फ्लॉप, तरीही आहे कोट्यवधींचा मालक

या प्रकरणी आधी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या, मात्र हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली. सध्या न्यायालयात मनाई आदेशाची मागणी करण्यात आली असून, पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मावळ तालुक्यातील उकसान गावात एकच खळबळ उडाली आहे.

Sonali Bendre
Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

तर दुसरीकडे सोनाली बेंद्रे यांचे वकील राजू शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून फिर्यादी शेतकरी हे प्रसिद्धी साठी आणि पैसे उकळण्याच्या उद्देशाने सिनेतारका सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा गोल्डी बहल यांची बदनामी करण्याचा डाव आखत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com