Dhurandhar 2 The Revenge Box Office: रणवीर सिंग आणि आदित्य धर यांचा चित्रपट 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2: The Revenge) रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. मंगळवारी, या चित्रपटाने केवळ बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून नवीन रेकॉर्ड केला नाही, तर भारतीय बॉक्स ऑफिसवर १,००० कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला हिंदी चित्रपट बनण्याच्या दिशेने कमाई करत आहे. या चित्रपटाचा दुसरा आठवडा आता पूर्ण होणार आहे. तरी चित्रपट उत्तम कमाई करत आहे.
चित्रपटांचे कलेक्शन मोडले
धुरंधर २ (Dhurandhar 2) आता भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने केजीएफ: Chapter 2 (८५९.७० कोटी),आरआरआर (७८२.२० कोटी) आणि कल्कि 2898 AD (६४६ कोटी) यांसारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. शिवाय, अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेचे ८१२.१४ कोटींची कलेक्शन मोडले आहे.
आतापर्यंतची कमाई
दिवस १, गुरुवार - १०२.५५ कोटी
दिवस २, शुक्रवार - ८०.७२ कोटी
दिवस ३, शनिवार - ११३.०० कोटी
दिवस ४, रविवार - ११४.८५ कोटी
दिवस ५, सोमवार - ६५.०० कोटी
दिवस ६, मंगळवार - ५६.६० कोटी
दिवस ७, बुधवार - ४८.७५ कोटी
दिवस ८, गुरुवार - ९.७० कोटी
दिवस ९, शुक्रवार - ४१.७५ कोटी
दिवस १०, शनिवार - ६२.८५ कोटी
दिवस ११, रविवार - ६८.१० कोटी
दिवस १२, सोमवार - २५.३० कोटी
दिवस १३, मंगळवार - २७.७५ कोटी
'धुरंधर २' चे कलेक्शन
बॉक्स ऑफिस रिपोर्टर 'सॅकनिल्क' (Sacnilk) च्या माहितीनुसार, या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १,०७७.४१ कोटींवर पोहोचले आहे. परदेशात, 'धुरंधर २: द रिव्हेंज'ने अंदाजे ३५८ कोटींची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन १,४३५.४१ कोटी झाले आहे. हा चित्रपट आता १,५०० कोटींचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
'धुरंधर २' कलाकार आणि प्रदर्शन
'धुरंधर २' हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात रणवीर सिंग अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, उदयबीर संधू, गौरव गेरा आणि राकेश बेदी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.