Famous Actress Death: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मेरी बेथ हर्ट यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्या गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली असून, त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
मेरी बेथ हर्ट यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. विशेषतः इंटीरियर्स, द वर्ल्ड अकॉर्डिंग टू गार्प आणि द एज ऑफ इनोसन्स या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी मोठी दाद दिली.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे चार दशकांहून अधिक काळ काम केले. ब्रॉडवे रंगभूमीवरही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. “क्राइम्स ऑफ द हार्ट”, “बेनेफॅक्टर्स” आणि “ट्रेलावनी ऑफ द वेल्स” या नाटकांतील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना तीन वेळा टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
मेरी बेथ हर्ट यांचा जन्म अमेरिकेतील आयोवा येथे झाला होता. त्यांनी न्यू यॉर्क यूनिव्हर्सिटी येथे अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यांच्या अभिनयात सूक्ष्म वास्तववादी सादरीकरण यामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली.
त्यांनी अभिनेते विल्यम हर्ट यांच्याशी लग्न केले होते. दोघांनी १९८२ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला त्यांनतर त्यांनी स्वत:ला आणखी एक संधी देत दिग्दर्शक पॉल श्रेडर यांच्याशी लग्न केले. त्यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे.
अल्झायमरच्या दीर्घ लढ्यानंतर त्यांनी अखेर २८ मार्च २०२६ रोजी न्यू जर्सी येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.