Famous Director Death: मनोरंजन विश्वातील तारा निखळला; प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

Famous Director Death: प्रसिद्ध दिग्दर्शक बॅरी कॅल्डवेल यांचे निधन झाले आहे. बॅरी कॅल्डवेल यांच्या निधनाची बातमी त्यांच्या एका मित्राने सोशल मीडियावर शेअर केली.
 Director Barry Caldwell Passes Away
Director Barry Caldwell Passes Away Saam Tv
Published On

Famous Director Death: हॉलिवूडमधील ॲनिमेशन क्षेत्रातील दिग्गज नाव असलेले ॲनिमेटर आणि दिग्दर्शक बॅरी कॅल्डवेल यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले आहे. 'ॲनिमानियाक्स' आणि 'पिंकी अँड द ब्रेन' सारख्या लोकप्रिय सिरीजच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या जवळच्या मित्राने आणि सहकारी ॲनिमेटर पॉल दिनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली, ज्यामुळे चाहत्यांमध्ये आणि उद्योगात शोककळा पसरली आहे.

पॉल दिनी यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहून आपल्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, करिअरच्या सुरुवातीच्या काळातच त्यांची बॅरी कॅल्डवेल यांच्याशी ओळख झाली होती. तो फक्त केवळ एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार आणि डिझायनर नव्हता, तर एक प्रतिभावान दिग्दर्शकही होता. संपूर्ण ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये त्याचा मोठा सन्मान होता, बॅरीच्या निधनाने माझे कधी न भरणारे खूप मोठे नुकसान झाले आहे, असे त्याने लिहीले.

 Director Barry Caldwell Passes Away
Dhurandhar 2: 'धुरंधर २' अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये खळबळ, पाकिस्तान कनेक्शन उघड

बॅरी कॅल्डवेल यांचा व्यावसायिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. त्यांनी School of Visual Arts येथे शिक्षण घेतले आणि १९८० च्या दशकात फॅट अल्बर्ट आणि कॉस्बी किड्स या सिरीजमधून ॲनिमेशन क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनीवॉर्नर ब्रदर्स ॲनिमेशन, वॉल्ट डिस्ने टेलिव्हिजन ॲनिमेशन आणि ड्रीमवर्क्स ॲनिमेशन यांसारख्या नामांकित स्टुडिओंसोबत काम केले.

 Director Barry Caldwell Passes Away
Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; कुटुंब बुडाले शोकसागरात

त्यांच्या कारकिर्दीत द स्मर्फ्स, ही-मॅन अँड द मास्टर्स ऑफ द युनिव्हर्स, द टॉम अँड जेरी कॉमेडी शो आणि चिप 'एन डेल रेस्क्यू रेंजर्स यांसारख्या गाजलेल्या मालिकांचा समावेश आहे. याशिवाय टायनी टून ॲडव्हेंचर्स, द टायगर मुव्ही, ऑस्मोसिस जोन्स, किम पॉसिबल आणि ड्रीमवर्क्स ड्रॅगन्स यांसारख्या कामांमध्ये त्यांने मोठे योगदान दिले. बॅरी कॅल्डवेल यांच्या निधनामुळे ॲनिमेशन क्षेत्रातील एक प्रतिभावान कलाकार हरपला आहे. त्यांच्या कामाची छाप आणि योगदान कायम स्मरणात राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com