Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; शूटिंगदरम्यान समुद्रात बुडून मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actor Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. शूटिंगदरम्यान समुद्रात बुडून अभिनेत्याचा मृत्यू झाला. वयाच्या 42व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.
Famous Actor  Passes Away
Famous Actor Deathsaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले.

अभिनेत्याने वयाच्या 42व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

शूटिंगदरम्यान समुद्रात बुडून अभिनेत्याचा मृत्यू झाला.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. बंगाली प्रसिद्ध अभिनेते राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिघा येथे एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राहुल यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

राहुल बॅनर्जी सध्या स्टार जलशाच्या लोकप्रिय मालिका 'भोले बाबा पार करेगा' मध्ये मुख्य भूमिकेत काम करत होते. यासाठी संपूर्ण शूटिंग युनिट दिघाजवळील तळसारी येथे आले होते. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर अभिनेता समुद्रात पोहायला गेला होता. या दरम्यान ते लाटांमध्ये सापडले आणि बुडू लागले. जेव्हा तेथील लोकांनी त्यांना बुडताना पाहिले, तेव्हा ते तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धावले आणि त्यांना बाहेर काढले. फेडरेशनच्या वतीनं दिगंत बागची यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा राहुल यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले, तेव्हा ते श्वास घेत होते. त्यांना तातडीने जवळच्या दिघा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तथापि, मृत्यूचे नेमके कारण बुडणे होते की अचानक आलेला हृदयविकाराचा झटका, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्व मेदिनीपूर जिल्हा पोलिसांनी अभिनेत्याच्या मृत्यूची अधिकृतपणे पुष्टी केली आहे.

अभिनेत्याच्या मृत्यूनंतर कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार मृत्यूचे कारण बुडणे हे आहे, परंतु पोलीस प्रत्येक पैलूचा सखोल तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. कायदेशीर प्रक्रिया आणि शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल.

राहुल अरुणोदय बॅनर्जी कोण?

राहुल अरुणोदय बॅनर्जी हे टॉलीवूडमधील एक सुप्रसिद्ध चेहरा आहेत. टेलिव्हिजनमध्ये येण्यापूर्वी त्याने अनेक नाटकांमध्ये काम केले. झी बांगलाच्या लोकप्रिय कार्यक्रम 'खेल'मध्ये आदित्यची भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.या यशानंतर त्याला चित्रपटाची ऑफर मिळाली, ज्यामुळे त्याला आणखी मोठी ओळख मिळाली. राहुलचा 'सहज कथा' हा पॉडकास्ट कार्यक्रमही खूप लोकप्रिय झाला.त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ते बऱ्याच काळासाठी एका मालिकेतही दिसले. अलिकडेच ते 'भोले बाबा पर करेगा' या मालिकेत दिसले. त्यांनी 'हरगौरी पैसे हॉटेल' या मालिकेतही काम केले आहे. राहुल यांनी राज चक्रवर्तीच्या 'चिर्दिनी तुम्ही जे आमार' या चित्रपटातून टॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

Famous Actor  Passes Away
Famous Actor Accident : प्रसिद्ध अभिनेत्याच्या दुचाकीचा भीषण अपघात; शस्त्रक्रियाही झाली, स्वतः सांगितला दुर्घटनेचा थरार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com