Fort In Mumbai : मुंबईत लपलेले एक ऐतिहासिक रत्न, 'या' किल्ल्यावर झालंय चित्रपटांचे शूटिंग

Shreya Maskar

माढ किल्ला

माढ किल्ला हा उत्तर मुंबईतील माढ बेटावर, आक्सा बीच, एरंगल बीच आणि किलेश्वर महादेव मंदिराच्या जवळ आहे.

Madh Fort | google

पोर्तुगीज किल्ला

माढ किल्ला १७ व्या शतकातील पोर्तुगीज किल्ला आहे. माढ किल्ला हा वर्सोवा किल्ला म्हणूनही ओळखला जातो.

Madh Fort | google

निसर्ग सौंदर्य

माढ किल्ल्यावरून अरबी समुद्र आणि शहराच्या क्षितिजरेषेचे विहंगम दृश्य दिसते. निसर्गाच्या सानिध्यात येथे सुंदर फोटो काढा.

Madh Fort | google

कसं जाल?

माढ किल्ला मालाड स्टेशनपासून जवळ आहे. तुम्ही मालाड स्टेशनला उतरून बस किंवा टॅक्सी जाऊ शकता. वर्सोवाहून फेरीने, मालाड आणि मार्वेला जोडणाऱ्या रस्त्याने येथे पोहोचतात.

malad | google

सिनेमाचे शूटिंग

माढ किल्ला बॉलिवूड चित्रपटांच्या चित्रीकरणाचे एक लोकप्रिय ठिकाण म्हणून तो प्रसिद्ध आहे.

filming location | yandex

किल्ल्याची सद्यस्थिती

माढ किल्ला सध्या सर्वसामान्य जनतेसाठी बंद असून, तो भारतीय हवाई दलाच्या नियंत्रणाखाली आहे. पण हा ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे.

Madh Fort | google

मुंबईतील किल्ले

मुंबईत वांद्रे फोर्ट, वरळी फोर्ट, सायन फोर्ट, शिवडी फोर्ट, माहीम फोर्ट आणि धारावी फोर्ट यांचा समावेश आहे.

Bandra Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Madh Fort | google

NEXT : महाराष्ट्रात राहून घ्या काश्मीरचा फिल, साताऱ्यातील 'हे' ठिकाण Summer ट्रिपसाठी ठरेल सुपर Cool

Hill Station In Satara | saam tv
येथे क्लिक करा...