Hill Station In Satara : महाराष्ट्रात राहून घ्या काश्मीरचा फिल, साताऱ्यातील 'हे' ठिकाण Summer ट्रिपसाठी ठरेल सुपर Cool

Shreya Maskar

साताऱ्याचे वैशिष्ट्ये

सातारा हे महाराष्ट्र राज्यातील सात टेकड्यांनी वेढलेले ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले शहर आहे. उन्हाळ्यात येथे फिरण्याचा नक्की प्लान करा.

Satara | google

तापोळा

'महाराष्ट्राचे मिनी काश्मीर' म्हणून ओळखले जाणारे तापोळा हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ कोयना धरणाच्या जलाशयाच्या काठावर वसलेले एक शांत गाव आहे.

Tapola | yandex

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर

तापोळा हे ठिकाण विशाल शिवसागर तलावासाठी (कोयना धरणाचे जलाशय) प्रसिद्ध आहे. येथील प्रमुख आकर्षणांमध्ये तलावातील बोटिंग, कयाकिंग आणि स्पीड बोट राईडचा आनंद घेऊ शकता.

Tapola | yandex

ट्रेकिंग स्पॉट

तापोळाजवळ वासोटा किल्ला आहे. जो ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकताय. वासोटा किल्ल्याला जाण्यासाठी तुम्ही जंगल ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.

Trekking | yandex

अभयारण्य

तापोळा जवळ कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या कडेने कोयना वन्यजीव अभयारण्य वसलेले आहे. तुम्ही येथे जवळून पक्षीनिरीक्षण करू शकता.

Wildlife Sanctuary | yandex

कसं जायचे?

उन्हाळ्यात थंड वातावरण अनुभवण्यासाठी तापोळा या ठिकाणाला नक्की जा. महाबळेश्वरपासून टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने तुम्ही येथे पोहचाल.

Satara | yandex

साताऱ्यातील पर्यटन स्थळे

साताऱ्यात ठोसेघर धबधबा, अजिंक्यतारा किल्ला, कास पठार आणि सज्जनगड ही लोकप्रिय पर्यटन स्थळ आहेत.

Kaas Plateau | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Tapola | yandex

NEXT : हत्ती स्वारीसाठी प्रसिद्ध आहे 'हे' ठिकाण, तलावाच्या काठावर वसलाय सुंदर किल्ला

India Tourism | google
येथे क्लिक करा...