Success story: अभिमानास्पद! दोन्ही पायांनी अपंगत्वावर मात करत चैतन्यने राष्ट्रीय पातळीवर पटकावली सुवर्णपदकं

चैतन्य लहानपणी अभ्यासात फारसा रमाला नाही. मुलांमध्ये रममाण होणारा त्यांना हसवणारा, दिलखुलास गप्पा मारणारा चैतन्य, कष्टकरी सामान्य कुटुंबात वाढत होता.
Success story
Success storysaam tv
Published On

चैतन्य विश्वास कुलकर्णी अहमदनगर जिल्ह्यातील दाढ गावी राहणारा... चैतन्य हा ७५% आस्थिव्यंग आहे. त्याची जीवन कहाणी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. Para Swiming मध्ये राष्ट्रीय पातळीवर त्यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. एकदा त्याचे सगळे मित्र शेतावर गेले. तिथे नारळाच्या झाडावर कोण चढेल याची पैज लागली. आता चैतन्यचा झाडावर चढण्याचा नंबर होता. तो बघता बघता सरसर झाडावर चढला आणि घसरगुंडी करून खाली यायचं तसा खाली आला. त्याचं वय ७/८ वर्षाच होतं. यावेी त्याला पैज जिंकल्याचा आनंदही झाला. इथून पुढे त्याला झाडावर चढायचा खेळच सुरु झाला.

नारळाच्या झाडावर सरसर चढणारा चैतन्य नारळ काढण्यासाठी नेहमी झाडावर चढत असे. १३-१४ वर्ष तो नारळ काढत होता. पुन्हा-पुन्हा झाडावर चढून तो पारंगत झाला होता. दुसन्या बाजूला कॉलेजचं शिक्षण सुरु होतं. कॉलेजचे दिवस सुरु झाले होते. एस.वाय.बी.कॉमची परीक्षा २-४ दिवसांवर होती. त्याचा अभ्यास चालू होता. यावेळी गावची जत्रा असून देवाला फोडायला नारळ हवे होते. म्हणून चैतन्य झाडावर सरकर चढला.

सवयीप्रमाणे अगदी सरसर चढून नारळ काढायचे. तो ४० फूट उंचीवर होता आणि अचानक नारळाच्या झाडाची फांदी निसटसली आणि तो खाली कोसळला. त्याचा चुलत भाऊ खाली होता यावेळी त्याने हाक मारायला सुरुवात केली. चैतन्य शुद्धीवर होता, भावाला वाटलं फार लागलं नसेल. मात्र तो उभा राहण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या पायांची हालचाल होत नव्हती. पण चैतन्यचे उपचार करायचेच म्हणून त्याला पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

चैतन्यच्या वडिलांचं साध पान शॉप होतं. यावेळी ऑपरेशनसाठी साधारण १० ते १२ लाख खर्च येणार होता. कर्ज, नातेवाईकांची मदत अशी जुळवाजुळव करून ऑपरेशन झालं. हाताचं ऑपरेशन यशस्वी झालं. पण पाठीच्या मणक्याला जबरदस्त मार लागल्याने पाठ आणि कमरेखाळची संवेदना नष्ट झाली आणि चैतन्याला नैसर्गिक विधी करण्यासाठी कंट्रोल नव्हता. त्याला यासाठी डायपर्सचा वापर करावा लागत होता.

Success story
Success Story: ऑनलाइन फुले विकून उभारली कोट्यवधींची कंपनी; दोन बहिणींची यशोगाथा वाचा

हसत्याखेळत्या चैतन्यसाठी हे सगळे फार अवघड, कठीण होतं पण तो सावरला.ऑपरेशन नंतर वर्षभर फिजीओथेरपी चाली होती. त्यातच त्याला स्वतःची कामं स्वतः करण्याचं प्रशिक्षण दिलं जात असे. कुटुंबाच्या आणि मित्र परिवाराच्या पाठिंब्यामुळे, प्रेमामुळे चैतन्य मनापासून व्यायाम करत होता. त्यानंतर त्याने स्विमिंगचा सराव सुरु केला. पाण्यात पोहताना त्याला समाधान वाटत होते. हळूहळू त्याची आणि प्राण्याची जणू दोस्ती झाली आणि मग त्याला Para Swiming मध्ये भाग घेता आता.

या खेळामधे सहभागी घेऊन सलग ४ वेळा त्याने राज्य स्तरावर सुवर्णपदक पटकावलं. तीनवेळा नॅशनलला खेळून एका सुवर्णपदक मिळवलं. तिन्ही वेळा गोव्यामध्ये झालेल्या नॅशनल ला गोवा १६ ते २२ ऑक्टोबर २०२० मधे चैतन्यने ५० मिटर फ्री स्टाईलमध्ये गोल्ड मेडल आणि १०० मिटर फ्री स्टाईलमधेधे गोल्ड मेडल मिळवलंय. याशिवाय १० मिटर बेस्ट स्ट्रोक मध्ये सिल्व्हर मेडल, ४५१०० मिटर फ्री स्टाईकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. या राष्ट्रीय स्पर्धेत चैतन्यने १०० मिटरमधे राष्ट्रीय रेकॉर्ड बनवलेत. एकूण नैशनलमध्ये चैतन्यला १३ पदके मिळाली आहेत.

Success story
Success Story: नोकरी करताना UPSC ची तयारी; तिसऱ्याच प्रयत्नात यश; IAS सर्जना यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

गुजरात मध्ये २०२३ ला झालेल्या सी स्विमींग मध्ये १ त्तास ४६ मिनीटात ५ किलोमीटर पोहून त्याने प्रथम क्रमांक मिळवला. एवढंच नाही तर चैतन्यला गिर्यारोहक म्हणूनही ओळखलं जातं. महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर त्याने 3 वेळा सर केलंय आहे. सध्या चैतन्य २०२६ एशियन गेम आणि २०२८ पॅराऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवण्यासाठी जिंकण्यासाठी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बातेवाडी स्टेडियम येथे स्विमींगची प्रॅक्टीस करतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com