ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दरवर्षी upscची परीक्षा होते. upsc चा अर्थ केंद्रीय लोकसेवा आयोग आहे.
upsc परीक्षा जगातील अतिशय कठीन परीक्षांपैकी एक आहे. upsc परीक्षा पास केल्यानंतर कोणकोणत्या नोकऱ्या मिळू शकतात. जाणून घ्या.
यूपीएससी परीक्षा पास केल्यानंतर वेगवेगळ्या पदावर नियुक्ती केली जाते.
परीक्षेतील टॉप रँक मिळवणाऱ्या उमेदवाराला आयएएस IAS ची पोस्ट मिळते.
तसेच यामध्ये आयपीएस IPS नोकरी देखील मिळते. या पदाअंतर्गत उपमहानिरिक्षक, पोलीस महानिरिक्षक आणि पोलीस महासंचालक सारखे पोस्ट असतात.
परीक्षा पास केल्यानंतर तुम्ही IFS ची नोकरी देखील करु शकता. IFS अधिकारी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतात.
upsc मध्ये IRSची नोकरी देखील असते. हे अधिकारी इनकम टॅक्स आणि कस्टम डिपार्टमेंट संबधित काम करतात.