ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांना काही विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो, कारण असे मानले जाते की ग्रहणाचा गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर परिणाम होऊ शकतो.
सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करू नये आणि कोणती कामे टाळण्याचा प्रयत्न करावा? जाणून घ्या.
असे मानले जाते की सूर्यग्रहणाचे तीव्र किरण बाळाला हानी पोहोचवू शकतात. ग्रहणाच्या वेळी घरातच राहणे चांगले.
गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणाच्या वेळी चाकू, कात्री, सुई इत्यादी गोष्टी वापरू नयेत. असे मानले जाते की यामुळे मुलाच्या अवयवांमध्ये काही दोष निर्माण होऊ शकतात.
सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी अन्न खाणे टाळावे परंतु फळे खाऊ शकतात. ग्रहणाच्या वेळी झोपणे देखील निषिद्ध मानले जाते.
सूर्यग्रहणाच्या वेळी निघणारा तेजस्वी प्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक असू शकतो, म्हणून ग्रहणाकडे थेट पाहणे टाळावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.